नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसचा अपघात, 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:01 AM2019-06-12T08:01:38+5:302019-06-12T16:13:36+5:30

मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यामध्ये मंगळवारी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात  4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

four killed in bus accident in vidisha madhya pradesh | नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसचा अपघात, 4 जणांचा मृत्यू

नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसचा अपघात, 4 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यामध्ये मंगळवारी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे.

विदिशा - मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यामध्ये मंगळवारी (11 जून) बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. नाशिकहून काही प्रवासी चित्रकूटला जात होते. साधारण बसमध्ये 50 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशमधील विदिशा-सागर रोडवर हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. 

नाशिकच्या सर्वज्ञ यात्रा कंपनीच्या बसचा अपघात झाला आहे. वळणावर चालकाचे गाडीवरील  नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. उज्जैनहून चित्रकूटला बस चालली होती. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकड़ा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मृताच्या नातेवाईकांना 4 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. 

शिवाजी पांडुरंग बोराडे (पिंपळगाव खांब),  सविता भगवंत ढिकले (सय्यद पिंपरी), दशरथ काशिनाथ जाधव (शिंदे गाव) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 

मयत, जखमी भाविकांच्या माहितीसाठी नातेवाईकांनी येथे संपर्क साधावा.
विदिशा पोलीस अधीक्षक कार्यालय : 07592: 234710
सिव्हिल लाईन पोलीस ठाणे, विदिशा : 07592 : 232826



 

Web Title: four killed in bus accident in vidisha madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.