फिरोजपूर : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी पहाटे केलेल्या कारवाईत दोन पाकिस्तानी घुसखोरांसह चार जणांना ठार केले. त्यांच्याजवळून १० किलो हेरॉईन, तीन पिस्तूल आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. भारत-पाकिस्तान सीमेजवळ ही कारवाई करण्यात आली.ठार झालेल्यांमध्ये दोघे पाकिस्तानी घुसखोर आणि दोघे भारतीय आहेत. हे सर्वजण मादक पदार्थांचे तस्कर असल्याचे सांगण्यात आले. बीएसएफच्या १९१ बटालियनला मेहंदीपूर सीमेवर पहाटे ४.४० वाजता काही लोक संशयास्पद स्थितीत दिसले. त्यांनी या चौघांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले; पण तसे न करता त्यांनी गोळीबार सुरू केला. बीएसएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे चौघेही मारले गेले. त्यांच्या ताब्यातून हेरॉईन असलेली प्रत्येकी एक किलो वजनाची दहा पाकिटे जप्त करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यांचा एक साथीदार पाकिस्तान सीमेत पळून गेल्याचा संशय आहे.
दोन पाकिस्तानी घुसखोरांसह चार ठार
By admin | Published: February 08, 2016 3:24 AM