बिहार : भारत-नेपाळ सीमेजवळ बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी शुक्रवारी सकाळी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) जवान आणि स्पेशल टास्क फोर्सचे जवान यांच्या संयुक्त पथकाने शोध मोहिम राबवली. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले. या कारवाईत नक्षलवाद्यांकडून अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.
एसएसबीचे आयजी संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांशी चकमक पहाटे 4.45 वाजता घडली. यात एक सुरक्षा कर्मचारीही जखमी झाला आहे.वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांच्या एका गटाविषयी आम्हाला माहिती मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरु होती.
नक्षलवाद्यांच्या गटाचे नेतृत्व राम बाबू साहनी उर्फ राजन करीत होता. त्याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, या चकमकीत त्याचा सहायक बिपुलसह इतर तीन जण ठार झाले. तर राम बाबू साहनीला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे, असे संजय कुमार यांनी सांगितले. याचबरोबर, नक्षलवाद्यांकडून एक एके- ५६ रायफल, तीन एसएलआर आणि एक ३०३ रायफल जप्त करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एसएसबीचे जवान ऋतुतुराज जखमी झाले आहेत, असेही संजय कुमार यांनी सांगितले.
आणखी बातम्या...
Vikas Dubey Encounter : उमा भारती म्हणाल्या, "मारेकरी ठार झाला, पण तीन गोष्टी रहस्यमय"
'एक शरद अन् शिवसेना गारद', पवारांच्या मुलाखतीवरून नारायण राणेंचा टोला
मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे
खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा
"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"
CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...