- नितीन अग्रवालनवी दिल्ली - भाजपने अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, जे.पी. नड्डा यांच्यासह ८ केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता पक्ष राज्यसभेच्या ५८ जागांसाठी होणाºया निवडणुकीसाठी दुसºया टप्प्यातील यादी तयार करीत आहे. या यादीत महासचिव सरोज पांडे, डॉ. अनिल जैन यांच्यासह प्रवक्ते अनिल बलुनी आणि जीव्हीएल नरसिंह राव यांचे नाव समाविष्ट केले जाऊ शकते. तथापि, काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय अन्य ९ उमेदवार जाहीर केले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने या चार नेत्यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. याशिवाय अशोक वाजपेयी यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. हरियाणा आणि छत्तीसगडचे प्रभारी महासचिव अनिल जैन हे पक्षातील दिग्गज नेत्यात गणले जातात, तर राजस्थानातून पक्षाने किरोडीलाल मीणा यांना संधी देण्याचे ठरविले आहे. त्यांनी आपल्या राष्ट्रीय जनतांत्रिक पार्टीचे विलीनीकरण भाजपत केले आहे. महाराष्ट्राच्या प्रभारी महासचिव सरोज पांडे यांनाही छत्तीसगडच्या एकमेव जागेवरून उमेदवारी दिली जाऊ शकते.१६ राज्यांत निवडणुकाज्या जागांवर निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेशातील १०, महाराष्ट्र आणि बिहारमधील ६, मध्यप्रदेशातील ५ आणि आंध्र, ओडिशा तथा राजस्थानच्या तीन-तीन जागा आहेत. याशिवाय अन्य काही राज्यांत राज्यसभेच्या जागा रिक्त होत आहेत. राज्यसभेत आपल्या जागा वाढविण्यासोबतच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणिते जुळविली जात आहेत.७ केंद्रीय मंत्र्यांसह८ उमेदवारांची घोषणाभाजपने आतापर्यंत ज्या ८ जणांची नावे जाहीर केली त्यात अर्थमंत्री अरुण जेटलींना उत्तर प्रदेशातून, मध्यप्रदेशातून थावरचंद गेहलोत व धर्मेंद्र प्रधान, गुजरातेतून मनसुखभाई मंडाविया व पुरुषोत्तम रुपाला, आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा हिमाचल प्रदेशातून, बिहारमधून रविशंकर प्रसाद यांना उमेदवार बनविण्यात आले आहे.एप्रिल आणि मे महिन्यात राज्यसभेच्या ज्या जागा रिक्त होणार आहेत त्यांच्यासाठी २३ मार्च रोजी मतदान होईल व २६ मार्चपर्यंत निकाल जाहीर होतील. त्यासाठी १२ मार्चपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. १५ मार्च रोजी अर्ज मागे घेता येईल.उमेदवारांची नावेनारायण राणे महाराष्ट्रव्ही. मुरलीधरन महाराष्ट्रसरोज पांडे छत्तीसगढअनिल बलुनी उत्तराखंडकरोडीलाल मीणा राजस्थानलेफ्ट. जी.डी.पी. वत्स हरियाणाअजय प्रताप सिंह मध्य प्रदेशकैलाश सोनी मध्य प्रदेशअशोक वाजपेयी उत्तर प्रदेशविजय पाल सिंह तोमर उत्तर प्रदेशसकल दीप राजभर उत्तर प्रदेशकांता करदम उत्तर प्रदेशडॉ. अनिल जैन उत्तर प्रदेशजी.व्ही.एल. नरसिंहराव उत्तर प्रदेशहरनाथसिंह यादव उत्तर प्रदेशराजीव चंद्रशेखर कर्नाटकसमीर उरोव झारखंडकाँग्रेसचे उमेदवारकुमार केतकर महाराष्ट्रनारनभाई राथवा गुजरातअमी याज्ञिक गुजरातधीरजप्रसाद साहू झारखंडडॉ. एल. हनुमंथय्या कर्नाटकडॉ. सय्यद नासीर हुसेन कर्नाटकजी. सी. चंद्रशेखर कर्नाटकराजमानी पटेल मध्य प्रदेशपोरिका बलराम नायक तेलंगणाअभिषेक मनू सिंघवी पश्चिम बंगाल
भाजपचे आणखी चार, काँग्रेसचे १० उमेदवार निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 4:24 AM