शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

चार खासदार निवृत्त, लोकसभेनंतर आता राज्यसभेतही BJP अल्पमतात; असा आहे नंबर गेम...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 8:08 PM

राज्यसभेत भाजपच्या सदस्यांची संख्या 90 च्या खाली आली आहे.

BJP in Rajyasabha : लोकसभेत बहुमत गमावल्यानंतर आता राज्यसभेतही BJP अल्पमतात आले आहे. राज्यसभेत पक्षाच्या सदस्यांची संख्या 90 च्या खाली आली आहे. याचे कारण म्हणजे, शनिवारी(दि.13) केंद्र सरकारने नामनिर्देशित केलेल्या चार खासदारांचा कार्यकाळ संपला. यानंतर राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या 86 वर आली. तर, NDA च्या खासदारांची संख्या 101 वर आली आहे. हा आकडा बहुमतापेक्षा खूपच कमी आहे. 

राज्यसभेत सध्या 226 सदस्य अशून, 19 जागा अजूनही रिक्त आहेत. राज्यसभेच्या रिक्त असलेल्या 19 जागांपैकी 4 जम्मू-काश्मीरमधील आणि 4 नामनिर्देशित सदस्यांसाठी आहेत. तर, उर्वरित 11 जागा वेगवेगळ्या राज्यांतील आहेत, ज्यात आसाम, बिहार, महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या खासदारांनी लोकसभा निवडणूक लढवल्यामुळे यापैकी अनेक जागा रिक्त झाल्या आहेत.

हे खासदार निवृत्त झालेमहेश जेठमलानी, सोनल मानसिंग, राम सकल आणि राकेश सिन्हा हे चार नामनिर्देशित खासदार शनिवारी निवृत्त झाले. चारही नामनिर्देशित खासदार भाजपमध्ये होते, त्यामुळे आता भाजपची संख्या 86 झाली आहे. एनडीएची संख्या 101 पर्यंत खाली आली आहे, जी सध्याच्या 113 च्या बहुमतापेक्षा कमी आहे. मात्र, 7 नामनिर्देशित उमेदवार आणि एक अपक्षही सरकारसोबत आहेत. त्यामुळे एनडीएचा आकडा 109 वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत वरच्या सभागृहात बहुमत मिळवण्यासाठी सरकारला वायएसआर काँग्रेस (11) आणि एआयएडीएमके (4) यांची मदत घ्यावी लागू शकते.

असा आहे नंबर गेमगेल्या टर्ममध्ये एनडीएला बीजेडी (9) आणि बीआरएस (4) यांचाही पाठिंबा होता. मात्र यावेळी बीजेडी पूर्णपणे सरकारच्या विरोधात आहे. लवकरच राष्ट्रपतींकडून 4 जागांसाठी नामांकन केले जाणार असून इतर 11 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ज्या 11 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे, त्यापैकी किमान 10 जागांवर एनडीएचा विजय निश्चित आहे. म्हणजेच, भाजप 100 च्या जवळपास पोहोचेल आणि एनडीए बहुमतात असेल. दुसरीकडे, काँग्रेसकडे सध्या 26 खासदार आहेत, जे विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी आवश्यक असलेल्या 25 पेक्षा फक्त एकने जास्त आहेत. तेलंगणातील राज्यसभा पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसची संख्या 27 वर पोहोचू शकते.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस