ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ४ - काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनी दिल्लीवरुन आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटायला नकार दिल्यानंतर विरोधीपक्षातील चार खासदारांनी फुटीरतवाद्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा निर्णय घेतला. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिलेले निमंत्रण या फुटीरतावाद्यांनी धुडकावून लावले.
सीपीएम सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआय नेते डी.राजा, जेडीयू नेते शरद यादव आणि राजदच्या जय प्रकाश नारायण यांनी हुर्रियत नेते सय्यद अली शहा गिलानी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. गिलानी नजरकैदेत आहेत. गिलानी यांनी या चार नेत्यांना भेटण्यास नकार दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
जेकेएलएफचा प्रमुख यासिन मलिकला भेटल्यानंतर शरद यादव म्हणाले की, भेट ठिक झाली. यासिन मलिक दिल्लीत येऊन भेटणार आहे असे त्याने सांगितले. हर्रियत नेत्यांना व्यक्तीगत स्तरावर भेटण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले.