ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - रघुराम राजन यांच्या जागी आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी केंद्र सरकार सध्या चार नावांवर विचार करत असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिका-याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे. चार नावांपैकी तिघांनी रिझर्व्ह बँकेमध्ये काम केले असून, एका देशातील सर्वात मोठया व्यावसायिका बँकेची प्रमुख आहे.
आरबीआयचे उपगव्हर्नर उर्जित पटेल, माजी उपगव्हर्नर राकेश मोहन, सुबीर गोकर्ण आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य या चार नावांवर चर्चा सुरु आहे. नवीन मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही लवकरच निवडली जाईल.
रघुराम राजन यांनी आरबीआय गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ स्वीकारण्यात स्वारस्य नसल्याचे मागच्या आठवडयात स्पष्ट केले. राजन यांच्या जागी त्याच तोडीचा अधिकारी आवश्यक आहे. कारण तीन वर्षात राजन यांनी महागाई नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते.