शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
4
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
5
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
6
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
7
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
8
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
9
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
10
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
11
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
12
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
13
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
14
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
15
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
16
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
17
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
18
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
19
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी चार मतदारसंघांत युती ‘कमनशिबी’

By admin | Published: September 24, 2014 12:33 AM

उसन्या उमेदवारावर भिस्त : युतीला शिरकाव होण्यात अडचणी

विश्वास पाटील - कोल्हापूर -जिल्ह्यातील दहापैकी चार मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीला आतापर्यंत कधीच गुलाल मिळालेला नाही. दोन्ही काँग्रेसच्या वर्चस्वाखालील जिल्हा व युतीकडून उसन्या उमेदवारांचा वापर ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत. भाजपला कोल्हापूर दक्षिणची (पूर्वीचा करवीर) जागा कधीच जिंकता आलेली नाही. शिवसेनेच्या वाट्याला राधानगरी, भुदरगड, शिरोळ आणि चंदगड मतदारसंघात यश आलेले नाही. या चारही मतदारसंघांत दोन्ही काँग्रेसचा प्रभाव व संस्थात्मक भक्कम जाळे हे युतीचा शिरकाव होण्यात अडचणीचे ठरले.शिवसेना-भाजपच्या जागावाटपात आतापर्यंत गेल्या पंचवीस वर्षांत या दोन्ही पक्षांनी लढविलेल्या, परंतु कधीच जिंकता न आलेल्या जागांची अदलाबदल हा कळीचा मुद्दा ठरला आहे. शिवसेनेच्या वाट्यातील राज्यातील १६९ पैकी तब्बल ५९ जागा अशा आहेत की, त्यावर शिवसेना कधीच जिंकलेली नाही. त्यामुळे त्यातील काही जागा भाजपला हव्या आहेत. त्या द्यायला शिवसेना तयार नाही. त्यामुळे जागावाटप अडले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अशा विधानसभा मतदारसंघांची माहिती घेतली असता चार मतदारसंघांत युतीच्या नशिबी कायम पराभव आला आहे. राज्यातील १९ जागांवर भाजपही कधीच जिंकलेला नाही. सध्याचा ‘कोल्हापूर दक्षिण’ हा पूर्वीचा करवीर मतदारसंघ होता. तो युतीत नेहमीच भाजपकडे राहिला. भाजपने मात्र या मतदारसंघातून प्रत्येक वेळी उसन्या उमेदवारास संधी दिली. २००४ च्या निवडणुकीत तर काँग्रेसचे अपक्ष उमेदवार असलेल्या सतेज पाटील यांनाच भाजपने पुरस्कृत केले. आपली एक जागा नाही वाढली तरी चालेल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा कमी होते, असा हिशेब भाजपने केला. पक्षाने आजपर्यंत या मतदारसंघांत कधीच पाच वर्षे तयारी करून व पक्षाच्याच कार्यकर्त्याला संधी दिली, असे घडलेले नाही. पक्षासाठी राबायचे कार्यकर्त्यांनी व ऐनवेळी दुसऱ्याच कुण्या धनदांडग्यांना उमेदवारी द्यायचे, असा व्यवहार भाजपकडून झाला आहे. आताही अमल महाडिक यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे, असे झाल्याने संघटना मोडीत निघाली आहे. पक्षासाठी राबूनही काही फायदा होत नाही, अशी भावना कार्यकर्त्यांत पसरली आहे.शिरोळ मतदारसंघातही काहीशी हीच स्थिती राहिली आहे. तिथेही या दोन्ही पक्षांचे फारसे संस्थात्मक काम नाही. संघटनाही वृत्तपत्रांत झळकणाऱ्या आंदोलनापुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या विरोधातील पक्ष म्हणून स्वाभिमानी संघटनेने स्वत:चे भक्कम अस्तित्व या मतदारसंघांत तयार केल्यावर आता तर हे दोन पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठीच संघर्ष करीत आहेत. प्रत्येक वेळेला नवा उमेदवार, असेच या मतदारसंघातही घडले आहे. गेल्या निवडणुकीतील उमेदवार राजू कुरडे यांना २८ हजार मते मिळाली; परंतु ते आता राष्ट्रवादीत आहेत आणि शिवसेना नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. चंदगड मतदारसंघात खुद्द चंदगड व आजरा तालुक्यातही या दोन्ही पक्षांना मानणारा वर्ग आहे. या तालुक्यांचा रोजगाराच्या निमित्ताने मुंबईशी असणारा संपर्क हे त्याचे मुख्य कारण आहे. युतीच्या काळात १९९५ ला भरमू पाटील अपक्ष म्हणून निवडून आले व त्यांनी सरकारमध्ये जाऊन बिनबजेटचे राज्यमंत्रिपद मिळविले; परंतु युतीची सत्ता असतानाही तिथे पक्षाची संघटनात्मक बांधणी झाली नाही. आंदोलनाच्या पातळीवर शिवसेना सतत चर्चेत दिसते. विजय देवणे जिल्हाप्रमुख झाल्यावर संघटना मजबूत करण्याचे काही प्रयत्न झाले; परंतु युतीचा उमेदवार स्वबळावर निवडून येऊ शकेल अशी स्थिती नाही. आतातर ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला जाण्याची चिन्हे आहेत, म्हणजे युतीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा पाच वर्षे पोस्टरला नुसती खळच लावायची.1995राधानगरी-भुदरगड मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला असतो. या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नामदेवराव भोईटे यांनी १९९५ ला युतीचे शासन आल्यावर त्या सरकारला पाठिंबा दिला; परंतु त्यांचा युतीला किंवा शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर काहीच फायदा झाला नाही. तिथेही संघटना अस्तित्वात आहे. आता उमेदवारी द्यायचा विचार झाला तेव्हा ताकदीचा उमेदवार म्हणून प्रकाश आबिटकर यांना आयात करण्यात आले. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असली तर तिला फारच मर्यादा आहेत. भाजप औषधालाही कुठे दिसत नाही. दोन्ही काँग्रेसचा प्रभाव लोकांवर जास्त आहे.1995राधानगरी-भुदरगड मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला असतो. या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नामदेवराव भोईटे यांनी १९९५ ला युतीचे शासन आल्यावर त्या सरकारला पाठिंबा दिला; परंतु त्यांचा युतीला किंवा शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर काहीच फायदा झाला नाही. तिथेही संघटना अस्तित्वात आहे. आता उमेदवारी द्यायचा विचार झाला तेव्हा ताकदीचा उमेदवार म्हणून प्रकाश आबिटकर यांना आयात करण्यात आले. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असली तर तिला फारच मर्यादा आहेत. भाजप औषधालाही कुठे दिसत नाही. दोन्ही काँग्रेसचा प्रभाव लोकांवर जास्त आहे.