अलपुझा/नवी दिल्ली : केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रामध्ये वॉटर स्पोटसचे प्रशिक्षण घेत असलेल्या चार अल्पवयीन मुलींनी ‘ओथालांगा’ हे विषारी फळ खाऊन सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात अपर्णा रामचंद्रन या १५वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर अत्यवस्थ असलेल्या तिघींवर अलपुझा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. वसतिगृहाची वॉर्डन आणि प्रशिक्षकांनी केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप अपर्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. क्रीडा क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या या घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार करणार नाही शिवाय राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशाराही अपर्णाच्या पालकांनी दिला आहे.‘साई’च्या अलपुझा केंद्रातील वसतिगृहात बुधवारी दुपारी ही घटना घडली. त्यानंतर चार तासांनी त्यांना अलपुझा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. साई केंद्रावर वॉटर स्पोर्ट्सचे प्रशिक्षण घेत असलेल्या या खेळाडूंच्या कुटुंबीयांनी मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे.
छळाला कंटाळून चार खेळाडूंनी घेतले विष!
By admin | Published: May 08, 2015 4:52 AM