शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

केडगावात चार दुकाने फोडली धाडसी चोरी : पोलीस चौकीच्या शेजारील घटना

By admin | Published: July 29, 2015 12:42 AM

अहमदनगर : केडगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत रात्री एकाचवेळी चार दुकानांचे शटर उचकटून आतील सामानाची उचकापाचक केली. चोरट्यांनी केडगावच्या मध्यवस्तीत धाडसी चोरी करून २१ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. यामुळे केडगावमधील व्यापार्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

अहमदनगर : केडगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत रात्री एकाचवेळी चार दुकानांचे शटर उचकटून आतील सामानाची उचकापाचक केली. चोरट्यांनी केडगावच्या मध्यवस्तीत धाडसी चोरी करून २१ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. यामुळे केडगावमधील व्यापार्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
केडगाव येथील बालाजी कॉलनी येथे महापालिकेचे भाग्योदय शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. यात पुरुषोत्तम भूकन यांचे किराणा दुकान आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरची पट्टी उचकटून आत प्रवेश केला. आतील काऊंटरमधील सहा हजार ४५० रुपयांची रोकड चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी राजेंद्र शिंगवी यांच्या मेडिकल दुकानात प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक करून १४ हजारांची रोकड चोरून नेली. दोन दुकाने फोडल्यानंतर चोरांनी आपला मोर्चा तेथून जवळच असलेल्या नवनाथ विरकर यांच्या नम्रता कलेक्शनच्या कापड दुकानाकडे वळविला. हे दुकानही फोडून १ हजार ६०० रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे ही दुकाने केडगाव पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर आहेत. तरी या चोरांनी धाडस दाखवून ही दुकाने फोडली. केडगाव-शाहूनगर रस्ता वर्दळीचा असतो. तरीही चोरट्यांनी दुकाने फोडण्याचे धाडस दाखवून पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
चोरट्यांनी जाता-जाता केडगाव देवीच्या रोडवरील माळवे ज्वेलर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरी केली. किती ऐवज गेला, याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. केडगाव पोलीस चौकीच्या मागील बाजूस लागून असलेल्या भाग्योदय कॉम्प्लेक्समध्ये चोरी होण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वीच्या चारही चोरींचा तपास लागला नसताना पाचवी धाडसी चोरी झाल्याने व्यापारी धास्तावले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने चोरीचा तपास सुरू केला. कोतवाली पोलीस ठाण्यात या चोर्‍यांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
----------------
चोरटे कॅमेर्‍यात कैद
चोरट्यांनी भाग्योदय कॉम्प्लेक्समध्ये धाडस दाखविले खरे पण तेथील सचिन ज्वेलर्सच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. दोन चोरट्यांचे चेहरे यात स्पष्ट दिसत आहेत. फुटेजमध्ये पावणेदोन वाजता ही चोरी झाल्याचे चित्रण आहे.
----