नवी दिल्ली - देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून काही राज्यांत जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. सिक्किममध्येही पावसाने थैमान घातले आहे. काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. याच दरम्यान मुसळधार पावसामुळे इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिक्किममध्ये पावसाचा कहर सुरू आहे. सिक्किमच्या मंगन परिसरातील एक चार मजली इमारत पावसामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुसळधार पावसामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. तळकोकणात काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. शेती पाण्याखाली गेली असून वाहतुकही विस्कळीत झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांना रविवारी पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून आला. पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. तसेच काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नाले, ओहोळ यांनाही धबधब्यांचे रूप आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Rajasthan Political Crisis : "तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर आपण जागे होणार आहोत का?"
"पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वच जण गुन्हेगारांना आश्रय देतात"
CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या संकटात देशातील 62 टक्के मुलांचं थांबलं शिक्षण, धक्कादायक अहवाल
CoronaVirus News : ट्रम्प यांचा 'हा' लूक पाहिलात का?, पहिल्यांदाच लावला मास्क अन्...
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पीपीई किट परिधान करून पानवाला चालवतोय टपरी