चार शिक्षक निलंबित
By admin | Published: July 18, 2016 11:32 PM
जळगाव : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये नियुक्ती मिळूनही रूजू न झालेल्या चार शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे.
जळगाव : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये नियुक्ती मिळूनही रूजू न झालेल्या चार शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. चारही शिक्षकांना मुक्ताईनगर येथे २६ जून रोजी नियुक्ती दिली होती. तर एका शिक्षकाला ५ जुलै रोजी नियुक्तीचे पत्र दिले होते. नियुक्ती करूनही संबंधित शिक्षक रूजू होत नव्हते. निलंबित झालेल्या शिक्षकांमध्ये (कंसात नियुक्तीचे ठिकाण) वाल्मीक काशीनाथ देवरे (काकोडा ता.मुक्ताईनगर), उज्ज्वला आसाराम चव्हाण (इच्छापूर ता.मुक्ताईनगर), नीता राजाराम शिंपी (सुकडी ता.मुक्ताईनगर) आणि किशोर मोतीलाल बाविस्कर (बोरखेडा ता.मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. देवरे व चव्हाण यांना निलंबन काळात चाळीसगाव पं.स.हे मुख्यालय दिले आहे. तर शिंपी व बाविस्कर यांना निलंबन काळातील मुख्यालय पारोळा पं.स. येथे देण्यात आले आहे.