श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत चार स्थानिक अतिरेकी ठार झाले.दारमदोरा भागात काही अतिरेकी लपलेले असल्याची गुप्त खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्या भागाची घेराबंदी केली व शोधसत्र हाती घेतले. याच वेळी त्या ठिकाणी लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. सुरक्षा दलानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याने चकमक उडाली. यात चार अतिरेकी ठार झाले.लष्कर व पोलिसांनी सांगितले की, ठार करण्यात आलेल्या अतिरेक्यांची ओळख पटली आहे. रफी हसन मीर, सुहेल अहमद भट,शौकत अहमद मीर आणि आजाद अहमद खांडे, अशी ठार करण्यात आलेल्या अतिरेक्यांची नावेआहेत.पोलीस प्रवक्त्याने हेअतिरेकी कोणत्या संघटनेशी जोडले गेले होते, याबाबत काहीही माहिती दिली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते अल-कायदाशी संबंधित अन्सार गजवतुल हिंदशी संबंधित होते.शौकतने तिघांना दिली चिथावणीशौकत अहमद मीर हा २०१५ मध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाला होता. उर्वरित तीन जणांनीही अलीकडेच त्याची साथ देण्यास सुरुवात केली होती. शौकत याने आजाद, रफी व सुहैल यांना दहशतवादाच्या मार्गावर आणण्यास चिथावणी दिली. शौकत हा सुरुवातीच्या काळात हिज्बुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेशी जोडला गेलेला होता.
काश्मीरमध्ये चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 4:51 AM