जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. चिन्निगाममध्ये एका कपाटाचे बंकरमध्ये रूपांतर करून चार दहशतवादी लपून बसल्याचे दिसत आहे. दरम्यान, सुरक्षा अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.या कपाटाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कुलगाम ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराचे दोन जवानही शहीद झाले होते. वेगवेगळ्या कारवाईत हिजबुलचे सहा दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांशी लढताना दोन जवान शहीद झाले, त्यापैकी एक एलिट पॅरा कमांडो. एवढ्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना ठार करणे हे मोठे यश असल्याचे जम्मू-काश्मीरचे डीआयजी पोलिस आरआर स्वेन यांनी सांगितले.
कुलगाममध्ये शहीद झालेले लान्स नाईक प्रदीप कुमार आणि कॉन्स्टेबल प्रवीण जंजाल प्रभाकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कुलगाममधील पहिले ऑपरेशन मदेरगाममध्ये सुरू झाले, यामध्ये एक जवान शहीद झाला. दुसरी चकमक चिनिगाम येथे झाली. येथे चार दहशतवादी मारले गेले तर एक जवान शहीद झाला. सर्व दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे असल्याचे सांगण्यात आले. एका स्थानिक कमांडरचीही ओळख पटली आहे.
यावर बशीर दार, जाहिद अहमद दार, तौहीद अहमद राथेर आणि शकील अहमद वानी अशी चिन्निगाममध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. मदेरगाममध्ये फैसल आणि आदिल असे दोन दहशतवादी मारले गेले. जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा सुरू असताना हे दहशतवादी हल्ले झाले आहेत. अलीकडेच रियासी येथे दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर हल्ला केला होता. साथीदारांच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी रविवारी जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील एका चौकीलाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्यानंतर ते पळून गेले.