श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा जिल्ह्याच्या जंगलात सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या भीषण चकमकीत लष्कराचे चार जवान शहीद झाले. तर जिल्ह्यातील दुसऱ्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हंदवाराच्या हफरुदा जंगलात दहशतवादी दडून बसले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यांना पकडण्याकरिता मोहीम राबविण्यात आली. या वेळी झालेल्या चकमकीत लष्कराचे ४ जवान शहीद झाले. दुसऱ्या घटनेत लोलाब भागात एका मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. रविवारी पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद (जेईएम) गटाचे दोन दहशतवादी ठार तर एक जवान जखमी झाला होता. ठार झालेले दोन्ही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतील अनेक मोठ्या हल्ल्यांत पाकस्थित जेईएमचा हात आहे. यात १३ डिसेंबर २००१ला संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)
चार जवान शहीद
By admin | Published: October 06, 2015 5:08 AM