शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

चौथी लस लवकरच बाजारात; झायकोव्ह-डी लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 9:20 AM

झायडस कॅडिलाची ‘झायकोव्ह-डी’ ही लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता बळावली आहे. 

देशात सद्य:स्थितीत कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही या तीन कोरोनाप्रतिबंधक लसी देण्यात येत आहेत. त्यातही स्पुतनिक व्ही लसीचे काही हजार डोसच उपलब्ध आहेत. त्यामुळे अधिकाधिक लसी भारतात येणे गरजेचे आहे. झायडस कॅडिलाची ‘झायकोव्ह-डी’ ही लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता बळावली आहे. 

तीन डोसवाली लस

देशात सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या तीनही लसी दोन डोसवाल्या आहेत. मात्र, ‘झायकोव्ह डी’ ही लस तीन डोसवाली असेल. या लसीच्या पहिल्या डोसनंतर उर्वरित दोन डोस २८व्या आणि ५६व्या दिवशी  दिले जातील. लस दोन  डोसमध्ये देण्याचे  प्रयत्नही सुरू आहेत.

डीएनए आधारित पहिली लस

झायडस कॅडिला ही औषध कंपनी ‘झायकोव्ह डी’ या लसीची निर्मिती करत आहे. या लसीला लवकरच आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. औषध महानियंत्रकांकडे कंपनीने त्यासाठी अर्ज करणे बाकी आहे. ‘झायकोव्ह डी’ ला मंजुरी मिळाली तर ती डीएनए आधारित पहिली लस ठरणार आहे. 

डीएनए आधारित लस शरीराची रोग प्रतिकारशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी जनुकीय साहित्याचा वापर करते. २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात ही लस ठेवता येऊ शकते. तसेच खोलीचे तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले तरी लस खराब होण्याची शक्यता कमीच असेल. 

लस कशी दिली जाईल-

  1. ‘झायकोव्ह डी’ ही नीडल  फ्री लस आहे. 
  2. ही लस देताना जेट इंजेक्टरचा वापर केला जाणार आहे. 
  3. जेट इंजेक्टर ही पद्धत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वापरली जाते. 
  4. या पद्धतीत उच्च दाबाने लस त्वचेवर इंजेक्ट केली जाते. 
  5. जेट इंजेक्टरमध्ये दाबासाठी कॉम्प्रेस्ड गॅस किंवा स्प्रिंग यांचा वापर केला जातो.
  6. अमेरिकेसह युरोप, आफ्रिका आणि आशियातील काही देशांमध्ये जेट इंजेक्टरचा वापर होतो.  
  7. जेट इंजेक्टरमुळे रुग्णास जास्त त्रास होत नाही तसेच संसर्गाचा धोका कमी होतो. 
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या