शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Fraud: फोनवरून रेल्वेचं तिकीट बुक करताय? मग खबरदार, IRCTC चं हे अॅप करू शकतं अकाऊंट खाली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 3:52 PM

IRCTC Fake App: तुम्हीही रेल्वेच तिकीट काढण्यासाठी IRCTC च्या अॅपचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण या माध्यमातून तुम्हाला गंडा घातला जाऊ शकतो.

हल्ली रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वेचं तिकीट बुक करणाऱ्यांपेक्षा ऑनलाईन तिकीट खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. तुम्हीही रेल्वेच तिकीट काढण्यासाठी IRCTC च्या अॅपचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण या माध्यमातून तुम्हाला गंडा घातला जाऊ शकतो. ऑनलाईन गुन्हेगारीचं प्रमाणा वाढत असतानाच या क्षेत्रातील ठग मंडळी लोकांना फसवण्यासाठी नवनवे मार्ग शोधून काढत आहेत. आता या गुन्हेगारांनी लोकांना फसवण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. तसेच याची अनेक लोक शिकार झाले आहेत. दरम्यान, हे प्रकार समोर आल्यापासूनआयआयसीटीसीचंअॅप कंपनीसुद्धा सतर्क झाली आहे. तसेच युझर्सना एक नोटिफिकेशनही पाठवलं आहे.

भारतीय रेल्वेचं अधिकृत ऑनलाईन तिकिट बुकिंग पोर्टल असलेल्या आयआरसीटीसीने अँड्रॉइड  मोबाईल फोन युझर्सना इशारा दिला आहे. या इशाऱ्यामध्ये कंपनीने सल्ला दिला आहे की, अँड्रॉईड फोनवर आयआरसीटीच्या नावाने चालणारी बनावट अॅप डाऊनलोड करणे टाळा, कारण त्यामाध्यमातून तुम्ही ऑनलाईन फसवणुकीची शिकार होऊ शकता. 

आयआरसीटीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या अॅपला डाऊनलोड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे त्या अॅपचं नाव  irctcconnect.apk असं आहे. तसेच आयआरसीटीसीने https://irctc.creditmobile.site या वेबसाईटवरही न जाण्याचा सल्ला दिला आहे. हे अॅप व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले जात होते. या अॅपची लिंक कुठल्याही युझरकडे आली, तर त्यावर क्लिक न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कारण या अॅपच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होत आहेत. 

जर तुम्ही हे अॅप डाऊनलोड केलं, तर तुमची बँक डिटेल्स, यूपीआय डिटेल्स, क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिटेल्स लीक होईल. त्यामुळे तुमचं प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकतं. आयआरसीटीसी कधीही लोकांकडे त्यांचे पिन, ओटीपी, पासवर्ड, क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिटेल्स, नेट बँकिंग पासवर्ड किंवा यूपीआयची डिटेल्स मागवत नाही. जर तुम्ही हे बनावट अॅप डाऊनलोड केलं तर तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही Google Play Store वरून IRCTC चं अधिकृत असलेलं  ‘IRCTC Rail Connect’ हे अॅप मोबाईलवर डाऊनलोड करा.  

टॅग्स :fraudधोकेबाजीIRCTCआयआरसीटीसी