फसवणूक
By admin | Published: July 12, 2015 11:56 PM
बनावट करारनाम्यावरून वाहन हडपण्याचा प्रयत्न
बनावट करारनाम्यावरून वाहन हडपण्याचा प्रयत्ननागपूर : बनावट करारनामा तयार करून एका महिलेची बोलेरो जीप हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर जरीपटका पोलिसांनी गुन्हे दाखल केले. राजू सैनी (बाबा बुद्धाजीनगर) आणि फिरोज खान (टेकानाका) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी राजू सैनी याने शिरीन सुलताना अब्दुल खलील (वय ५५, रा. कामगार नगर, नारी रोड) यांच्या मालकीची बोलेरो (एमएच ४० / वाय ९३६०) विकत घेण्याचा करार केला. त्यानंतर फायनान्सरकडे रक्कम जमा न करताच बनावट कागदपत्रे तयार करून ही बोलेरो फिरोज खानच्या ताब्यात दिली. २ ऑगस्ट २०१४ पासूनची ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर शनिवारी दुपारी शिरीन यांनी जरीपटका पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरुन जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. -----भूखंडाची बनावट कागदपत्रे बनविली नागपूर : मानेवाड्यातील रुपाली प्रवीण कळंबे (वय ३०) यांच्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या सात आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. काशीनाथ तुकाराम सोनवणे , राधिकाताई काशीनाथ सोनवणे, रोशन लहानुजी बाळसराफ, सचिन लहानुजी बाळसराफ, तेजराम छोटेलाल पारधी, गेडाम टेलर आणि नितीन शितलप्रसाद चौबे अशी आरोपींची नावे आहेत. १३ एप्रिल ते ११ जुलै या कालावधीत उपरोक्त आरोपींनी रुपाली प्रवीण कळंबे यांच्या जरीपटका हद्यीतील मौजा नारी, पहन ११, खसरा नं. १२६ ची बनावट कागदपत्रे तयार केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कळंबे यांनी शनिवारी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ---