नवी दिल्ली : बीएसएनएलच्या लॅण्डलाईनवरून दर रविवारी आता मोफत कॉल करता येणार आहेत. देशभरातील कोणत्याही लॅण्डलाईन आणि मोबाईलवर कितीही मोफत कॉल करता येतील. दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. स्वातंत्र्यदिनी आज या योजनेचा शुभारंभ होत आहे. दरम्यान, मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे दुर्लक्षित झालेला लॅण्डलाईन फोन यानिमित्ताने कात टाकत आहे. ही आॅफर नवे ग्राहक जोडण्यास मदत करील, असा अंदाज आहे. दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, बीएसएनएलचे ग्राहक १५ आॅगस्टपासून या योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्यानंतर प्रत्येक रविवारी मोफत कॉलची ही सुविधा असेल. बीएसएनएलच्या ग्राहकांना रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल करण्याची सुविधा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>नव्या ग्राहकांना नवीन कनेक्शन ४९ रुपये मासिक भाड्यानेकंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले की, रात्रीच्या मोफत कॉलची सुविधा सुरूच राहील, तर नवीन योजनेचा लाभही या ग्राहकांना घेता येईल. तथापि, नव्या ग्राहकांना बीएसएनएलचे लाईन कनेक्शन ४९ रुपयांच्या मासिक भाड्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तर ग्राहक आपल्या पसंतीनुसार यापेक्षा वेगळ्या पॅकजचे कनेक्शन घेऊ शकतो. लॅण्डलाईन फोनसाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठीच ही योजना सुरू करण्यात आली आहे. 1.43 कोटी ग्राहकांकडे बीएसएनएलच्या लँडलाइन फोन आहेत.57% बाजारात बीएसएनएल लँडलाइनची एकूण भागीदारी
बीएसएनएलच्या लँडलाइनवरून रविवारी मोफत कॉल
By admin | Published: August 15, 2016 5:53 AM