नवी दिल्ली : अजूनही वीज नसलेल्या देशातील शहरे व खेड्यांमधील चार कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज पुरविण्याच्या ‘सहज बिजली हर घर योजने’चा (सौभाग्य योजना) शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केला.या योजनेला १६, ३२० कोटी रुपये खर्च येईल व तो सर्व निधी केंद्र सरकार उपलब्ध करून देईल. ही योजना पूर्ण झाल्यावर देशातील एकही घर विजेशिवाय राहणार नाही, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. मोदी म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी आम्ही सत्तेवर आलो, तेव्हा देशातील १८ हजार गावांमध्ये वीज नव्हती. आज ही संख्या तीन हजारांवर आली आहे. सरकारने योजलेल्या उपायांमुळे देश ‘वीजटंचाई’तून ‘वीज शिलकी’कडे जात आहे.सरकारने २६ कोटी एलईडी बल्ब देशभर वाटले, त्यामुळे आज ग्राहकांचे विजेचे बिल १३,७०० कोटी रुपयांनी कमी झाले आहे, असेही मोदी म्हणाले.वीज नसलेल्या घरांना वीज पुरविण्याखेरीज रॉकेलला पर्यायी इंधन पुरविणे, शिक्षण आणि आरोग्यसेवांमध्ये सुधारणा करणे, दळणवळण आणि सार्वजनिक सुरक्षा पुरविणे, तसेच रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासोबतच महिलांचे दैनंदिन जीवन सुकर करणे इत्यादींचा समावेश असेल.लोकसभा निवडणुकांवर डोळातसे पाहिले, तर या योजनेत नवे असे काहीच नाही. किंबहुना, या आधीपासून सुरू असलेल्या विविध योजनांची एकत्र मोट बांधून, ही योजना नव्या नावाने सुरू केल्याचे दिसते.राजकीय निरीक्षकांच्या मते, मोदींनी ही योजना सुरू करून, एक प्रकारे २०१९ च्या सार्वजनिक निवडणुकीची तयारीच सुरू केली. देशात सरकारविषयी असंतोष व नाराजी वाढत असताना आणि दिलेली आश्वासने फारशी पूर्ण होत नसल्याचे दिसत असताना, सरकार काहीतरी करते आहे, हे दाखविणे गरजेचे होते.पं. दीनदयाळ यांच्या पुतळ््याचे अनावरणजनसंघ या भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीश्रमीच्या अवताराचे एक संस्थापक, पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधांनी ही योजना देशाला समर्पित केली. पं. दीनदयाल ऊ र्जा भवनात हा कार्यक्रम झाला. तेल आणि भूगर्भ वायू महामंडळ या देशातील सर्वात मोठ्या तेल कंपनीच्या मुख्यालयासाठी ही इमारत ६०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. तेथे मोदी यांनी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ््याचेही अनावरण केले.भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये ‘नवभारत’साठी सहा कलमी अजेंडागरीबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कचºयापासून देशाला मुक्त करून, सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला. येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात अशा आशयाचा ठराव संमत केला गेला.
४ कोटी कुटुंबांना मोफत वीज जोडणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 6:23 AM