नवी दिल्ली : रेल्वेत प्रवास करताना विक्रेत्याकडून खाद्यपदार्थांचे बिल देण्यात आले नाही तर, या पदार्थांचा मोफत आस्वाद घ्या. हे रेल्वे खात्याचे आदेश आहेत. काही केटरर्स जादा दर आकारत असल्याने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हा निर्णय घेतला.विक्रेत्यांचे लायसन्स रद्द होईलरेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांकडून जेव्हा खाद्यपदार्थ अथवा पेय यांचे बिल मागण्यात येते, तेव्हा पावती पुस्तक नसल्याचे कारण देत बिल दिले जात नाही. अथवा, भोजन सेवेचा वेळ संपल्यानंतर बिल दिले जाईल असे सांगितले जाते. गतवर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या काळात याबाबत ७००० तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर रेल्वेमंत्री गोयल यांच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलण्यात आले.
रेल्वेमध्ये पदार्थांचा मोफत घ्या आस्वाद, पीयूष गोयल यांच्या सूचना, तक्रारीनंतर उचलले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:20 PM