शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

Free Schemes: मोफत योजनांमुळे देशाचा 'आर्थिक विनाश' होईल, फ्री कल्चरवर सुप्रीम कोर्टाचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 1:47 PM

Freebie Culture: मोफत योजना देणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द करावी, यासाठी भाजपकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Free schemes Supreme Court: निवडणुकीदरम्यान मोफत सुविधा देण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशाप्रकारची याचिका भाजपकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली, यावेळी सर्वोच्च न्यायालयाने देशात सुरू असलेल्या फुकटच्या योजनांवर(फ्री कल्चर) चिंता व्यक्त केली आहे. 

केंद्र सरकारचा युक्तिवादसुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, 'फुकटच्या योजना देशाला आर्थिक विनाशाकडे घेऊन जाऊ शकतात. मोफत योजनांचा कोणालाही दीर्घकालीन फायदा होणार नाही.' केंद्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल म्हणाले की, 'अशाच प्रकारच्या मोफत घोषणा देशाला आर्थिक विनाशाकडे घेऊन जातील. जोपर्यंत सरकार याबाबत कायदा आणत नाही, तोपर्यंत न्यायालयाने हस्तक्षेप करून मार्गदर्शक तत्त्वे ठरवून द्यावीत.'

निवडणूक आयोगाला फटकारलेदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगालाही यावेळी फटकारले. 'आम्हाला प्रतिज्ञापत्र मिळत नाही, मात्र तेच प्रतिज्ञापत्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केले जाते,' असे कोर्टाने म्हटले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीवेळी जाहीर होणाऱ्या मोफत योजनांना 'फ्री रेवाडी संस्कृती' म्हटले आहे. तर, आम आदमी पार्टीने यावरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. विशेष म्हणजे, भाजप नेत्याच्या याचिकेत, मोफत योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचत असल्याचे म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने सूचना मागवल्यासर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सर्व पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत. दुसरीकडे, दिल्लीत सत्तेत असलेल्या 'आप'च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल करण्यात आले असून, त्यात पक्षकार बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. समाजकल्याण योजना आणि मोफत मिळणाऱ्या योजना यात फरक आहे, असा युक्तिवाद आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाAAPआप