इंदूर (मध्यप्रदेश) : कोरोना रुग्णांसाठी इंदूरचे तीन अभियंत्यांचे पथक राज्याच्या सरकारी रुग्णालयांत व्हेंटिलेटरशी संबंधित तांज्ञिक सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेत गुंतलेले आहेत.हे पथक केवळ केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडातून दिलेले नवीन व्हेंटिलेटरच लावत नाही तर जुन्या व्हेंटिलेटरची दुरुस्ती करून ते पुन्हा सुरू करून देत आहे.महामारीच्या दुसऱ्या लाटेत मागील दीड महिन्याच्या कालावधीत राज्यात शेकडो किलोमीटरचा प्रवास केलेल्या या पथकात इंदूरचे पंकज क्षीरसागर, चिराग शाह व शैलेंद्र सिंह या तीन अभिंयत्यांचा समावेश आहे. नाशिक, हुबळीहूनही बोलावणे येते पंकज क्षीरसागर यांनी सांगितले की, सोशल मीडियावर मध्यप्रदेशातील या मोहिमेची एवढी प्रसिद्धी झाली की आम्हाला महाराष्ट्राच्या नाशिक व कर्नाटकच्या हुबळीमधील रुग्णालयांतूनही बोलावणे येत आहे. व्हेंटिलेटर एक्स्प्रेसला सुरुवातीला नवीन व्हेंटिलेटर स्थापित करण्यास चार तासांचा वेळ लागायचा. सततच्या सरावाने हे तीन सदस्यीय पथक आता जीवनरक्षक उपकरण तासाभरात सुरू करून देत आहे.
मध्यप्रदेशात अनोख्या व्हेंटिलेटर एक्स्प्रेसची नि:शुल्क सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 9:16 AM