शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निवडणुकीत मोफत वस्तू, दारू, रोख रकमेचा महापूर, निवडणूक आयोगाची कारवाई; १७६६ कोटींचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 6:42 AM

Assembly Election 2023: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांना भुलविण्यासाठी मोफत वाटण्यात येणाऱ्या वस्तू, रोख रक्कम, दारू तसेच काही ठिकाणी अमली पदार्थ असा एकूण १७६६ कोटी रुपयांचा ऐवज निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आला.

नवी दिल्ली - मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांना भुलविण्यासाठी मोफत वाटण्यात येणाऱ्या वस्तू, रोख रक्कम, दारू तसेच काही ठिकाणी अमली पदार्थ असा एकूण १७६६ कोटी रुपयांचा ऐवज निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आला. या राज्यांमध्ये निर्भय व भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणुका पार पडाव्यात म्हणून आयोगाने ही कारवाई केली.

आचारसंहिता भंग झाल्याची प्रकरणे- २०१८ साली या पाच राज्यांत जप्त केलेल्या ऐवजापेक्षा यंदाच्या विधानसभा निवडणुकांत ताब्यात घेतलेल्या ऐवजाची किंमत पाचपट असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. - स्थानिक निवडणूक यंत्रणेकडून आलेल्या तक्रारी व मिळालेल्या माहितीच्या आधारे निवडणूक आयोगाने वेळोवेळी कारवाई केली. - आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आयोगाने अनेक नेत्यांना नोटीसाही बजावल्या. - रयतू बंधू योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारने आर्थिक मदत देऊ केली. मात्र त्या राज्याच्या मंत्र्यांनी याबाबत जाहीर घोषणा केल्याने आचारसंहितेचा भंग झाला. - या प्रकरणी आयोगाने तेलंगणा सरकारला नोटीस बजावली. आचारसंहितेच्या काळातही शेतकऱ्यांना रब्बी पिकांबाबत आर्थिक मदत देण्यासाठी काही अटींवर आयोगाने सरकारला नंतर परवानगी दिली.

अनेक बड्या नेत्यांना बजावल्या नोटिसाविरोधकांनी केलेल्या तक्रारींनुसार विविध प्रकरणांत निवडणूक आयोगाने राहुल गांधी, प्रियंका गांधी, हिमंता बिस्वा सरमा, के. चंद्रशेखर राव या नेत्यांना निवडणूक आयोगाने नोटीसा जारी  केल्या होत्या. 

कर्नाटक सरकारला धरले धारेवरकर्नाटक सरकारने आपल्या योजनांविषयी तेलंगणातील वृत्तपत्रांत जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्याविषयी आयोगाने कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागविले होते. अशा जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी कर्नाटक सरकारने आमची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असल्याचा मुद्दा आयोगाने या पत्रात उपस्थित केला होता. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक