नवी दिल्ली : देशाच्या ग्रामीण, दुर्गम व शहरी भागातील सर्व म्हणजे सुमारे ८,५०० रेल्वे स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या योजनेसाठी ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.‘डिजिटल इंडिया’ या सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रेल्वे खात्याने अलीकडेच २१६ महत्त्वाच्या स्थानकांवर ‘वाय-फाय’ सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकांतील मोफत इंटरनेट सेवेचा सुमारे सत्तर लाख प्रवाशांना लाभ मिळत आहे. रेल्वे खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, दैनंदिन जीवनात इंटरनेट ही महत्त्वाची गरज झाली असून देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर वाय-फायद्वारे मोफत इंटरनेट सेवा पुरविण्यात येणार आहे.देशातील १,२०० रेल्वे स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’ची सुविधा ही मुख्यत्वे रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. त्यशिवाय ग्रामीण व दुर्गम भागातील ७,३०० रेल्वे स्थानकांत फक्त प्रवासीच नव्हे तर स्थानिक रहिवासीही ‘वाय-फाय’ सुविधेद्वारे मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतील.ग्रामीण भागामध्ये डिजिटल बँकिंग, आधार कार्ड तयार करणे, सरकारी प्रमाणपत्रे, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आॅनलाइनद्वारे मिळविणे, करभरणा, बिले भरणे या सर्व गोष्टींसाठी इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर जनतेकडून व्हावा असे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.2019च्या मार्चपर्यंत देशातील सर्व म्हणजे सुमारे ८५०० स्थानकांत ही सेवा उपलब्ध करून देण्याचे रेल्वे खात्याने ठरविले आहे.216महत्त्वाच्या स्टेशन्सवर सध्या मोफत वायफायची सुविधा दिली जाते. त्याची सेवा जवळपास ७० लाख प्रवासी घेत आहेत.लोकसभेसाठी फायदा-देशातील सर्व म्हणजे ८५०० रेल्वे स्थानकांवरवाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट मार्च २०१९पर्यंत पूर्ण करण्यात येईल. याच वर्षी आगामी लोकसभा निवडणुका होणार असून त्यामध्ये वाय-फाय सुविधा उद्दिष्टपूर्तीचा मुद्दा भाजपाकडून प्रचारात वापरला जाण्याची शक्यता आहे.डिजिटल इंडिया हा उपक्रम मोदी सरकारने कसा यशस्वीरीत्या राबविला हे दाखविण्यासाठी रेल्वे स्टेशनांतील वाय-फाय सुविधा उपलब्धतेच्या मुद्दा भाजपाकडून जोरकसपणे सांगितला जाऊ शकतो.ग्रामीण भागातही सेवा-ग्रामीण व दुर्गम भागातील रेल्वे स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून दिल्यास स्थानिक जनतेला त्याचा वापर करता येईल.त्याचप्रमाणे या भागातील रहिवाशांना रेल्वे स्थानकातील ‘वाय-फाय’ सेवेचा वापर करून इ-कॉमर्स पोर्टलवरून अनेक वस्तूंची खरेदी करणेही सुलभ होईल.
सर्व रेल्वे स्टेशनांवर मोफत ‘वाय-फाय’ सेवा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 3:47 AM