शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

फ्रीडम 251 मोबाईल 28 जूनपासून उपलब्ध होणार- रिंगिंग बेल

By admin | Published: June 14, 2016 6:50 PM

251 रुपयांमध्ये स्मार्ट फोन उपलब्ध करून देणारी रिंगिंग बेल कंपनी वादाच्या भोव-यात सापडली होती.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - काही दिवसांपूर्वी 251 रुपयांमध्ये स्मार्ट फोन उपलब्ध करून देणारी रिंगिंग बेल कंपनी वादाच्या भोव-यात सापडली होती. कालांतरानं त्यांनी या फोनची बुकिंगही बंद केली होती. मात्र आता या 251 रुपयांच्या स्मार्ट फोनची डिलिव्हरी 28 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती रिंगिंग बेल या कंपनीनं दिली आहे. ज्या ग्राहकांनी हा फोन ऑनलाइन विकत घेतला आहे. त्यांना त्या फोनची डिलिव्हरी 28 जूनला मिळणार असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. 

रिंगिग बेल ही नायडास्थित कंपनी आहे. या फोन आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी या सुविधेवर देणार असल्याची माहिती रिंगिंग बेल कंपनीचे संचालक मोहीत गोयल यांनी दिली आहे. स्मार्ट फोन फ्रीडम 251 हा मोबाईल लाँच झाला होता. तेव्हा ग्राहकांच्या त्यांच्यावर उड्या पडल्या होत्या. मात्र काही काळानं या फोनची डिलिव्हरी बंद करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये रिंगिंग बेल कंपनीनं वेबसाइटच्या माध्यमातून या फोनची विक्री सुरू केली होती. मात्र हा स्मार्ट फोन जगातील सर्वात स्वस्त असल्यानं वादात सापडला होता. काहींच्या मते ही पाँझी योजना असल्याचंही वाटत होतं. या वेबसाइटलाही ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.

30 हजारांहून अधिक ग्राहकांनी हा फोन बुक केल्यानं डिलिव्हरीसाठी ग्राहकांना अडचणी येत होत्या. 7 हजारांहून अधिक ग्राहकांनी या फोनसाठी रजिस्ट्रार केलं होतं. या फोनच्या उत्पादनाला 2500 रुपये खर्च येत असल्याचीही माहितीही रिंगिंग बेल कंपनीचे संस्थापक अशोक चड्डा यांनी दिली आहे.