नवी दिल्ली - मैत्री दिनाचं औचित्य साधत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "हम दो, हमारे दो की सरकार" असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खास Video शेअर केला आहे. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यासोबत दिसत आहेत. राहुल यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासातच हजारो लोकांनी तो लाईक केला आहे.
राहुल गांधी हे विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. "देशवासियांचीमन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती" असं म्हटलं होतं. 'कुठे आहे लस?' असा हॅशटॅग वापरून मोदी सरकारला सवाल विचारला. "देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती" अशा शब्दांत टीकास्त्र सोडलं. तसेच देशातील कोरोना लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि मीडियातील बातमीचा उल्लेख करत एक व्हिडिओही राहुल यांनी शेअर केला होता.
"मंत्र्यांची संख्या वाढली पण कोरोना लसीची नाही"; राहुल गांधींचा मोदी सरकारला सणसणीत टोला
"मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला होता. "मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही!" असं म्हणत कोरोना लसी कुठं आहेत असा सवालही त्यांनी केला. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये एक फोटो ट्विट केला. ज्यामध्ये देशातील कोरोना लसीकरणासंदर्भातील आकडेवारी देण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी डिसेंबर 2021 पर्यंत देशात 60 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीकरणाचे 2 डोस देणं आवश्यक आहे असं म्हटलं होतं. "केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगा लावणार. संपत्ती, आरोग्य आणि आपला जीव गमावणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.