शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

तासांवर विकली जाणारी मैत्री

By admin | Published: March 11, 2016 12:34 PM

आपल्या स्वभावाचं, आपला आनंद शेअर करणारं, ज्याच्याशी मनातलं बोलू शकू असं सच्च्या मैत्रीचं आताशा कुणीच भेटू नये इतकं कोरडं, अलिप्त का झालं असेल अनेकांचं आयुष्य?

एकटेपणावर बाजारपेठेचा जालीम उपाय! 

- चिन्मय लेले
मुंबई, दि. ११ - जमाना स्टार्टअपचा आहे. कुणाला  काय उद्योग, कल्पना सुचेल याचा नेम नाही. विशेष म्हणजे, नुस्ता उद्योग सुचून उपयोग  नाही, तर लोकांची गरज अचूक ओळखून, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून त्यातून आपला उद्योग वाढीस लावण्याचं कसबही अंगी हवंच. त्यातून अमेरिकेतल्या काही तरुणांनी आता नवीनच उद्योग सुरू केला आहे. त्याचं नाव आहे, ‘रेण्ट अ फ्रेण्ड’. आणि एकटी अमेरिका कशाला, आता जगभरात ही नवीन इंडस्ट्रीच सुरू होणार अशी चर्चा आहे. तिचं नाव आहे फ्रेण्ड रेण्टल इण्डस्ट्री.
जपानमध्ये या अजब उद्योगाची सुरुवात झाली, पण त्यानं मूळ धरलं ते अमेरिकेत. सध्या अमेरिका आणि कॅनडात या उद्योगाची बरीच चर्चा आहे. ‘रेण्टअफ्रेण्ड डॉट कॉम’ या वेबसाइटच्या माध्यमातून चालणा-या या उद्योगात सध्याच दोन लाखांवर अनेक लोकांनी स्वत:ला सदस्य म्हणून (पैसे देऊन) नोंदवलं आहे. स्कॉट रोजबम यानं ही वेबसाइट सुरू केली. तो म्हणतो, ‘मैत्री अशी भाडय़ानं कशी देताघेता येईल याची तात्त्विक चर्चा करण्यात मला रस नाही. मोठय़ा शहरात अनेकजण एकेकटे आहेत. साधं पबमध्ये, बाहेर जेवायला, कुठं सिनेमाला, लॉँग ड्राइव्हला जायचं तर कुणी सोबत नाही. मग ते एकेकटे कुढत घरात बसतात. त्यापेक्षा थोडे पैसे दिले आणि आपल्यासारख्याच आवडीनिवडी असलेलं कुणी ‘सोबत’ म्हणून स्वीकारलं तर काय बिघडतं? यातून अनेक माणसांमध्ये पुढे मैत्रीही होऊ शकते. मुळात जे असे भाड्यानं मित्र म्हणून जातात त्यांच्यासाठी काही नियम असतात. कुठल्याच प्रकारचं गैरवर्तन करायचं नाही, शारीरिक लगट नाही, ‘तस्लं’ काही नाही. फक्त निखळ मैत्रीनी आवडीनिवडीचं शेअरिंग इतपतच हे सारं मर्यादित ठेवणं अपेक्षित नाही तर कॉण्ट्रॅक्टनुसार कायदेशीररीत्या बंधनकारकही असतं. त्यामुळे काळाची गरज म्हणून या उद्योगाकडे पाहायला हवं!’
आता तर अमेरिकेपासून दूर पूर्वेला ऑस्ट्रेलियातही हे ‘फ्रेण्ड्स फॉर हायर’ नावाचे उद्योग सुरू झाले आहेत. आणि तिकडे या विषयावरून बरीच चर्चा झडते आहे, वाद आहेत, तरुण मुलांच्या एकटेपणाची चर्चा आहे असं इंटरनेट धुंडाळलं तर दिसतं! पण मुख्य मुद्दा म्हणजे गरज काय ही अशी काही तासांची मैत्रीपूर्ण सोबत भाडय़ानं घेण्याची? तर त्याचं एका शब्दात उत्तर आहे ते लाइफस्टाइल.
अतिवेगवान जीवनशैली. मोठय़ा शहरातले बडे जॉब्ज. लांबच लांब कामांचे तास. रात्र होऊन जाते पण ऑफिसच्या बाहेर अनेकांना पडता येत नाही. कुठं कुणाकडे जाता येत नाही की सोशलायझिंग नाही. त्यातल्या काहींचे मित्रंचे ग्रुप्सही नसतात नवख्या शहरात. सहका:यांशी आताशा मैत्री होईनाशी झाली आहे अशी गत. त्यामुळे सुटीच्या दिवशी कुठं बाहेर जायचं, अगदी शॉपिंगलाही जायचं तर सोबत कुणी नाही. कार आहे पण लॉँग ड्राइव्हला एकटय़ानंच जायचं, पैसे आहेत पण हॉटेल-सिनेमा-पबमध्ये जायचं तर सोबत नाही.
जे मुलग्यांचं तेच मुलींचंही! त्यात एकेकटय़ानं जायचं तर मजा येत नाही. आणि जे सोबत आहेत त्यांना आपल्या विषयात रस असेलच असंही नाही. म्हणजे म्युझियम, गाण्याचे कार्यक्रम, जिम, शॉपिंग, बर्ड वॉचिंग. असे किती प्रकार. त्यात मित्रमैत्रिणींना रस नसला तरी हळूहळू अनेक जणांचं एकेकटय़ानं हे सारं करणं बंद होतं. मग त्यावर उपाय काय? काही सूज्ञ लोकांना गरज आहे की, यांना मित्रांची गरज आहे. त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीनं अशा ‘गरजू’ची गाठ घालून द्यायला सुरुवात केली. त्यातून काहींना सोबत मिळाली, तर काहींना पैसे. दोन तास ते दोन दिवस असे आता मित्र भाडय़ानं घेणं सुरू झालं. आपण अशा रेण्ट केलेल्या ‘मित्र’ सोबत म्युझियम कसं पाहिलं, शॉपिंग कसं केलं याचे किस्से अनेकजण आता जगजाहीर शेअरपण करत आहेत.
मुख्य म्हणजे आपल्याला जिवाभावाचे मित्र नाहीत, अपेक्षाविरहित मैत्री आपल्या वाटय़ाला आलेली नाही याचा खेद किंवा खंत कुणी व्यक्त करताना दिसत नाही. उलट आपला ‘एकटेपणा’ संपायला आणि आपल्या आवडीनिवडीतला आनंद नव्यानं जगायला आपण यातून सुरुवात केली असं अनेकजण सांगत आहेत! 
हे सारं असं ‘घडत’ असताना प्रश्न मात्र पडतोच की, असं का व्हावं? आपल्या स्वभावाचं, आपलाच आनंद शेअर करणारं, आपण ज्याच्याशी मनातलं बोलू शकू असं सच्च्या मैत्रीचं आताशा कुणीच भेटू नये इतकं कोरडं, अलिप्त का झालं असेल अनेकांचं आयुष्य? प्रश्न आहेच. आणि माणसांच्या गरजांची आणि प्रश्नांची तड लावत त्यातून पैसे कमवण्याची बाजारपेठेची तयारीही आहे. म्हणून मग बाजारपेठ कामाला लागलेली दिसते. आणि मैत्री भाडय़ानं देण्याचे स्टार्टअप्सही कामाला लागलेले दिसताहेत. जागतिकीकरण अनेक गोष्टी बदलून टाकेल अशी चर्चा पूर्वी होतीच. पण म्हणजे किती आणि काय काय बदलेल. याची ही एक फक्त झलक आहे!
 
स्वकेंद्री जगणारं पैसेफेकू जग
मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, नव्या जगात मानवी जगण्याची ही शोकांतिका आहे!  
 
या ‘रेण्टल’ मैत्रीविषयी जगभरातले मानसोपचारतज्ज्ञ मात्र अत्यंत गंभीर मत व्यक्त करत आहेत. त्यांना काळजी आहे मेट्रो शहरातल्या तारुण्याच्या बदलत्या मानसिकतेची!
अनेक मानसोपचारतज्ज्ञ आणि मनोविकारतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मोठय़ा शहरात ‘एकेकटे’ राहण्याचे प्रश्न जगभरच गंभीर होत चालले आहेत. कुठं बाहेर जायचं तर, काही सेलिब्रेट करायचं तर ‘आपली’ वाटावी अशी अनेक माणसं अवतीभोवती नसल्याची समस्या अनेकांची आहे. दुसरीकडे ही ‘एकेकटी’ माणसं सतत कानाला आणि हाताला चिकटलेल्या मोबाइलमध्ये हरवलेलीही दिसतात. सतत कनेक्टेड. व्हर्च्युअल माणसांनी वेढलेले. मात्र तरीही अत्यंत एकेकटे. ही अशी ‘भाडय़ानं’ घेतली जाणारी मैत्री हे समाजस्थितीचं अत्यंत दु:खद रूप आहे. मानवी नाती किती पोकळ होत चालली आहेत हे तर यातून दिसतं आहेच; पण अति स्वकेंद्री जगणं माणसांना कुठवर घेऊन जाणार याचीही ही एक झलक आहे. आपल्याच आनंदात वाटेकरी हवेत, दुस-याशी जुळवून घेत आपला आनंद जगणं हे आता कालबाह्य होईल की काय, अशी भीतीही अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  
माणसाला सच्चे मित्र मिळू नयेत, आणि पैसे फेकून या ‘सेवा’ विकत घ्याव्या लागाव्यात हे अत्यंत भयाण चित्र आहे, असंही मत काहीजण व्यक्त करत आहेत.