नवी दिल्ली : क्रिप्टाेकरन्सीद्वारे प्राप्त हाेणाऱ्या उत्पन्नावर १ एप्रिलपासून कर आकारणीला सुरुवात हाेणार आहे. यासंबंधीचे विधेयक लाेकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये क्रिप्टाेकरन्सीद्वारे हाेणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्याची घाेषणा केली हाेती. याशिवाय त्यावर इतर उपकर आणि अधिभारही लावण्यात येणार आहेत.
तसेच डिजिटल मुद्रेद्वारे १० हजार रुपयांपेक्षा अधिक पेमेंट असल्यास त्यावर १ टक्के टीडीएस कापण्याची तरतूदही विधेयकात आहे. ही तरतून जुलैपासून लागू हाेणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, क्रिप्टाेमध्ये नुकसान झाले तरीही त्याचे नफ्याच्या तुलनेत समायाेजन करण्यात येणार नाही.