झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नाराजीच्या चर्चांमुळे सध्या झारखंडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यादरम्यान, चंपई सोरेन हे दिल्लीमध्ये आले आहेत. दिल्लीत आल्यावर त्यांना प्रसारमाध्यमांनी गाठलं तेव्हा प्रतिक्रिया देताना चंपई सोरेन म्हणाले की, मी येथे माझ्या खासगी कामासाठी आलो आहे. तसेच भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत विचारलं असता त्यांनी मी सध्या जिथे आहे तिथेच आहे, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, चंपाई सोरेन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बायोमधून त्यांच्या पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाचे नाव काढून टाकले आहे. आता चंपाई सोरेनच्या नवीन बायोवर फक्त झारखंडचे माजी मुख्यमंत्री लिहिले आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
झारखंडच्या राजकारणात खळबळ, भाजपा प्रवेशाची चर्चा, दिल्लीत आलेले चंपई सोरेन म्हणाले...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेदरम्यान दिल्लीला रवाना झाले आहेत. माजी मुख्यमंत्री रविवारी कोलकाता येथून राष्ट्रीय राजधानीला रवाना झाल्याचा दावा चंपाई सोरेन यांच्या जवळच्या सहाय्यकाने केला. दिल्लीला पोहोचल्यानंतर लगेचच, चंपाई सोरेन म्हणाले की, मी कोणत्याही भाजप नेत्याला भेटलो नाही आणि राष्ट्रीय राजधानीला वैयक्तिक भेटीवर आलो आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चा सुरू होत्या. या चर्चेवर चंपाई सोरेन यांनी भाष्य केलेले नाही.जमशेदपूरला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, मला अशा प्रकारच्या अंदाज आणि अहवालांबद्दल काहीही माहिती नाही. मी जिथे आहे तिथेच आहे.
दरम्यान, आता चंपाई सोरेन यांनी सोशल मीडियावरील बायोवरुन पक्षाचे नाव काढले आहे. दरम्यान, याबाबत भाजपाचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अमर बौरी म्हणाले की, माझ्याकडे कोणताही अधिकारी नाही. याची माहिती मला फक्त माध्यमांद्वारे माहिती मिळत आहे.
मी इथे खासगी कामासाठी आलो
माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना चंपई सोरेन यांनी सांगितले की, तुम्ही लोक ज्या प्रकारे मला प्रश्न विचारत आहात त्यावर मी काय बोलणार. मी सांगितलंय की मी इथे खासगी कामासाठी आलो आहे. तसेच मी जिथे आहे तिथेच राहणार आहे. त्यानंतर कोलकाला येथे सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत विचारलं असता. चंपई सोरेन म्हणाले की, माझी कोलकात्यामध्ये कुणाशीही भेट झाली नाही. मी खासगी कामामुळे येथे आलो आहे. त्याबाबत नंतर तुम्हाला सांगेन.