आजपासून काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, १५ राज्यांमधून होणार प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 06:06 AM2024-01-14T06:06:29+5:302024-01-14T06:08:04+5:30
न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही राज्यघटनेतील तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
इंफाळ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेला रविवारी मणिपूरमधून सुरुवात होत आहे. ही यात्रा १५ राज्यांतील १०० लोकसभा मतदारसंघांतून प्रवास करणार आहे.
न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही राज्यघटनेतील तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील एका मैदानातून यात्रेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व पक्षाचे सर्व प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.