ऑनलाइन लोकमतसौदी अरेबिया, दि. 22 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दहशतवादाचा बळी असल्याचं म्हटलं आहे. रियादमध्ये इस्लामिक देशांच्या नेत्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ट्रम्प यांनी इतर देशांना दहशतवादाविरोधात लढण्याचं आव्हान केलं आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र दौ-यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 इस्लामिक देशांच्या नेत्यांना संबोधित केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषणात मुस्लिम देशांच्या नेत्यांना दहशतवादाचा खात्मा करण्याचं आवाहन केलं आहे. या पवित्र धरतीवर दहशतवादाला थारा देऊ नका. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफही उपस्थित होते. ट्रम्प म्हणाले, दहशतवाद जगामध्ये पसरतोय. दहशतवादाचे जगभरातील जवळपास सर्वच देश बळी आहेत. काही देश दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेपासून भारत आणि रशियासारखे देशही प्रभावित होत आहेत. ट्रम्प म्हणाले, धर्माच्या नावाखाली चाललेला दहशतवादाचा खेळ आता बंद झाला पाहिजे. सौदी अरेबियासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर काहीसा बदलल्याचं नजरेस आलं आहे. ट्रम हे दहशतवादाला उद्देशून संपूर्ण इस्लामिक दहशतवाद असा शब्द नेहमीच वापरत आले होते. दहशतवादाच्या मुद्द्यावर पश्चिम आणि इस्लाममध्ये कोणतीच लढाई नाही. खरं तर ही चांगले आणि वाईट यातील लढाई आहे, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकेचा उद्देश हा दहशतावादाच खात्मा करण्याचा आहे. इथे आम्ही भाषण देण्यासाठी नव्हे, तर चांगलं भविष्य घडवण्यासाठी आम्ही आलो आहोत, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.
नवाज शरीफांसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकला सुनावले खडे बोल
By admin | Published: May 22, 2017 4:14 PM