साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: September 04, 2015 10:46 PM
पुणे : उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळावा, या मागणीसाठी हिंंदस्थान प्रजा पक्षातर्फे शुक्रवारी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष नवनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मागण्यांचे निवेदन अधिकार्यांना देण्यात आले. तसेच साखर आयुक्तांचा निषेध म्हणून कार्यालयातील काही अधिकार्यांच्या टेबलवर काळी शाई फेकण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.
पुणे : उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळावा, या मागणीसाठी हिंंदस्थान प्रजा पक्षातर्फे शुक्रवारी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष नवनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मागण्यांचे निवेदन अधिकार्यांना देण्यात आले. तसेच साखर आयुक्तांचा निषेध म्हणून कार्यालयातील काही अधिकार्यांच्या टेबलवर काळी शाई फेकण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.-------------