शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पीएम योजनेच्या नावावर ठगबाजी; सरकारचे कारवाईचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 2:35 AM

बनावट वेबसाईटच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मिळविण्याचा उद्योग

नवी दिल्ली : बनावट वेबसाईटमार्फत ठगबाजी करणाऱ्यांनी पंतप्रधान आवास, मेक इन इंडिया किंवा अन्य योजनेला सोडले नाही. या योजनांच्या नावावर लोकांची दिशाभूल करून देशभरात ठगबाजी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने कारवाईचे निर्देश जारी केले आहेत.

सोशल मीडियावर झळकलेल्या एका संदेशात म्हटले होते की, नरेंद्र मोदी देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानिमित्त ‘मेक इन इंडिया’ योजनेतहत दोन कोटी युवकांना मोफत लॅपटॉप दिला जाईल. आतापर्यंत यासाठी ३० लाख युवकांना अर्ज केले आहेत. आता तुम्हीही या जाळ्यात अडकू शकता? एका संदेशात मोफत सोलार पॅनलचे आमिष दाखवून ठकविण्यात आले आहे. 

योजनांचा लाभ घेण्यासाठी फक्त एक अर्ज करावा लागेल. यासाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून २०१९ आहे, असे या संदेशात म्हटले आहे. (सोबत एचटीटीपी :// सोलार-पॅनल डॉट सरकारी योजना डॉट इन/हॅशटॅग अशी लिंक देण्यात आली आहे.) तथापि, सरकारी योजनांच्या नावावर फसवणूक करण्यांविरुद्ध सरकारने कठोर पावले उचलली आहेत.

यावर्षी जानेवारीत पंतप्रधान आवास योजनेच्या नावावर फसवणूक करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने या ठगबाजांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून २४ ते ४८ तासांच्या आत अटक करण्याचे आदेश दिले.बनावट वेबसाईट चालविणार ठगबाज लोकांचा डाटा चोरी करतात आणि हा डाटा विकून कमाई करतात. यामुळे वैयक्तिक माहितीही हस्तगत केली जाऊ शकते. पोलिसांनी अलीकडेच बनावट वेबसाईट चालविणाºया राकेश जांगिड (नागौर, राजस्थान) याला अटक केली. केले. आयआयटी कानपूरचा पदव्युत्तर असलेला राकेश चुलत भावासोबत जाहिरातींच्या माध्यमातून ही वेबसाईट चालवीत होता. पोलिसांनी ३० मे रोजी त्याच्याविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यातहत गुन्हा दाखल केला असून त्याचे कॉम्प्युटरही जप्त केले आहे.

आवास योजनेच्या नावावर गंडाठगबाज पंतप्रधान आवास योजनेच्या नावावरही बनावट वेबसाईट बनवितात. यावर नोंदणी करणाºयांना घर देण्याचे आश्वासन देतात. नोंदणीच्या नावाने ३ ते ५ हजार रुपये शुल्क म्हणून वसूल करतात. शुल्क अदा केल्यानंतर वेबसाईट बंद होते. सोबत देण्यात आलेला फोन नंबरही बंद होतो.

मेक इन इंडियाचा लोगो...नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानिमित्त मोफत लॅपटॉपसाठी तातडीने अर्ज करावेत, असा संदेश सोशल मीडियावर झळकत आहे. या सोबत एक लिंकही (एचटीटीपी://मोदी-लैपटॉप डॉट सरकारी-योजना डॉट इन/हॅशटैग) देण्यात आली आहे. लिंकवर जाताच पेज समोर येते. तेथे सर्वांत वर पंतप्रधानांच्या फोटोसोबत ‘मेक इन इंडिया’ लोगोही आहे. अर्जाच्या खाली नाव, मोबाईल नंबर, वय, राज्य आदी माहिती विचारली जाते.

टॅग्स :fraudधोकेबाजी