करनाल : पेट्राेल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याेगासने करून फिटनेसचा फंडा देणारे याेगगुरू बाबा रामदेव इंधन दरवाढीबाबत प्रश्न विचारल्यानंतर पत्रकारावर भडकले. संतापाच्या भरात त्यांनी पत्रकारला ‘गप्प बस, नाही तर चांगले हाेणार नाही’, अशी धमकीही दिली. बाबा रामदेव यांनी जनतेला जास्त परिश्रम करण्याचा सल्लाही दिला. महागाई कमी झाली पाहिजे, असे मलाही वाटते, पण लोकांनी जास्त मेहनत करायला हवी.
नेमके काय झाले?१ बाबा रामदेव हे करनाल येथे मित्र महाराज अभेदानंद यांना भेटण्यासाठी गेले हाेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. मात्र, पेट्राेल आणि डिझेल दरवाढीबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर ते भडकले.२पत्रकाराने त्यांना काही वर्षांपूर्वी त्यांनीच केलेल्या, पेट्राेल ४० रुपये प्रतिलीटर आणि घरगुती गॅस ३०० रुपये प्रतिसिलिंडर दराने देणाऱ्या सरकारला निवडून द्यायला हवे, या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यावर बाब रामदेव यांनी संतापून उत्तर दिले, की हाे, मी म्हणालाे हाेताे. तुम्ही काय करू शकता, असे प्रश्न विचारू नका. ३मी तुमचा ठेकेदार आहे का जाे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत राहणार? यानंतर पत्रकाराने पुन्हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बाबा रामदेव चांगलेच भडकले. हाे, मी केले हाेते वक्तव्य, आता तू काय करणार आहेस? गप्प राहा, पुन्हा प्रश्न केला तर तुझ्यासाठी हे चांगले नसेल. थाेडा सभ्य राहायला शिक, असा सल्लाही त्यांनी पत्रकाराला दिला.