नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. आज पुन्हा इंधन दरवाढीने दिवसाची सुरुवात झाली आहे. मुंबईत सोमवारी (1 ऑक्टोबर ) पेट्रोल 24 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 31 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रतिलिटर दर 91.08 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 79.71 झाला आहे.
(सौजन्यः पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम)
हेच का अच्छे दिन ? आता विनाअनुदानित सिलेंडरही 59 रुपयांनी महागला
राजधानी दिल्लीत पेट्रोल 24 पैसे तर डिझेल 30 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 83.73 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 75.09 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना प्रदूषणापासून वाचविणाऱ्या सीएनजीसह घरगुती गॅस आणि विमान प्रवासावरही दरवाढीची वक्रदृष्टी पडली आहे. केंद्र सरकारने दिल्लीमध्ये सीएनजीचा दर प्रती किलो 1.70 रुपयांनी वाढविला असून नोएडामध्ये 1.95 रुपयांनी दर वाढविला आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर तब्बल 59 रुपयांनी वाढविल्याने सर्वसामान्य ऐन सणासुदीला महागाईत चांगलेच भरडले जाणार आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांची दिवाळीही महागणार आहे.