नवी दिल्ली : आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे उघडपणे समर्थन करणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांनी महागाई व इंधन दरवाढीवरून टीकास्त्र सोडले.लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदींना इंधन दरकपात करावीच लागेल. न केल्यास सरकारलाच ही महागाई खूप महागात पडेल, असा इशाराही रामदेव यांनी दिला. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास मी ३५ ते ४० रुपयांत पेट्रोल व डिझेल विकेन. पेट्रोल व डिझेल हे जीएसटीखाली आणावे. यावेळी आपण भाजपचा प्रचार करणार का, असे विचारता त्यांनी नकारार्थी स्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले की मी सर्व पक्षांचा आणि तरीही अपक्षच आहे.
सरकारला इंधन दरवाढ महाग पडेल; रामदेव बाबा यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:57 AM