शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातून हद्दपार करावे- खा. संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 4:07 PM

छिंदमला तुरूंगात मारहाण झाल्याचीही चर्चा आहे.

दिल्ली: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारा  भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी खा. संभाजीराजे यांनी केली. ते शनिवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रासह दिल्लीत शिवजयंतीचा उत्साह असताना अशा पद्धतीचे वक्तव्य सत्ताधारी पक्षाचे उपमहापौर करतात. तुम्ही आता भाजपचे सहयोगी खासदार आहात, तेव्हा तुम्हाला याबद्दल काय वाटते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.त्यावेळी संभाजीराजेंनी म्हटले की, माझ्यासाठी छत्रपती शिवराय हा विषय पक्षाच्या पलीकडचा आहे. असल्या माणसांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी आता जरी माफी मागितली असली तरी नुसत्या माफीने खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तत्पूर्वी श्रीपाद छिंदमला शनिवारी सकाळी 9 वाजता अहमदनगरच्या सबजेलमध्ये दाखल केल्यानंतर तेथील कैद्यांनी त्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी त्याला मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिलेला नसला तरी सबजेलमधून छिंदम याला हलविण्यात यावे, असे पत्र न्यायालयाला दिले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून छिंदम याला सबजेलमधून हलवावे, असे पत्र सबजेल प्रशासनाने न्यायालयाला दिले आहे. निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला सुरक्षेच्या कारणास्तव येरवडा कारागृहात हलवणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने शुक्रवारी नगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. पोलीसांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता छिंदमला अटक केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तोफखाना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छिंदम याला शनिवारी सकाळी ८ वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने छिंदमला १ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. छिंदम याच्यावर सरकारी कामात अडथळा व धार्मिक भावना दुखवल्याचे तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ के़ एम़ कोठुळे यांनी छिंदमच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. यावेळी छिंदम याच्या बाजुने युक्तीवाद करण्यासाठी कोणी वकिल नव्हता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांनी त्याला न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. दरम्यान छिंदम याला सबजेलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे छिंदमला कैद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. छिंदम याची लवकरच नगर बाहेर रवानगी होणार असल्याचे समजते.

टॅग्स :Shripad Chindamश्रीपाद छिंदमBJPभाजपाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती