नवी दिल्ली : महाराष्ट्राप्रमाणोच हरियाणातही सोमवारी सायंकाळी प्रचाराचे वादळ शांत झाले. बुधवारी हरियाणातील 1 कोटी 55 लाख मतदार 9क् आमदारांना निवडण्यासाठी मतदान करणार असून, त्यासाठी रिंगणात 1351 उमेदवार आहेत.
मावळत्या विधानसभेत काँग्रेस 4क्, इंडियन नॅशनल लोकदल 31,भाजपा 4 व 7 अपक्ष आमदार आहेत. भाजपाचे 4आमदार निवडून आले होते, तेव्हा 72 जणांना अनामतही वाचवता आली नव्हती. यावेळी काँग्रेस, भाजपा, इंडियन नॅशनल लोकदल, हरियाणा चेतना पार्टी, हरियाणा लोकहित पार्टी व बसपाचे उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सभानंतर येथील मतदारांनी नेमक्या कोणत्या मुद्यांवरून निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरविले आहे, ते 19 रोजी कळेल. 2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 4 आमदार निवडून आले तर 72 जणांना अनामतही वाचवता आली नव्हती. (विशेष प्रतिनिधी)
अशी आहे स्थिती
15} मतदार 18 ते 25 वयोगटातील, 45 टक्के स्त्री मतदार
पक्षनिहाय संख्या
9क् काँग्रेस, 9क् भाजपा, 87 बसपा
88 हरियाणा लोकहित पार्टी
65 हरियाणा जनहित काँग्रेस
14 सीपीआय, 17 सीपीएम