सपोटरा/करौली : राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील सपोटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुकना गावात जमिनीच्या वादातून जिवंत जाळण्यात आलेल्या पुजाºयाच्या मृतदेहावर ४८ तासांनंतर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत पुजारी बाबूलाल यांना न्याय मिळावा, अशी मागणी करीत डॉ. किरोडीमल मीणा, डॉ. मनोज राजौरिया आणि रामचरण बोहरा, हे तीन खासदार धरण्यावर बसलेले होते. पीडित कुटुंबाला द्यावयाच्या भरपाईच्या पॅकेजवर सहमती झाल्यानंतर सायंकाळी बाबूलाल यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी स्थानिक खासदार मनोज राजोरिया आणि गंगापूरसिटीचे माजी आमदार मानसिंग मीणा सकाळी घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक तपासात दोषी आढळल्यास त्यास निलंबित केले जाईल. हलगर्जीपणा केल्याबद्दल गावच्या तलाठ्यास हटविले जाईल. पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सरकारसोबत वाटाघाटी होऊन मृताच्या कुटुंबास देण्यात येणाºया भरपाई पॅकेजवर ४ वा. सहमती झाली. त्यानुसार, मृताच्या परिवारास १0 लाख रुपयांची भरपाई, तसेच एका सदस्यास नोकरी देण्यात येईल.