माणसांकडून माणसांमध्ये आजार पसरतो. तर काही आजार हे प्राण्यांपासून माणसांनाही होतात. पण तुम्हाला कोणी एखादी व्यक्ती झाडाच्या संपर्कात आल्यावर आजारी पडते असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही, पण हे खरं आहे. भारतात अशी धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीला झाडांपासून होणारा आजार झाला आहे. डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. असा आजार होणारी जगातील ही पहिली व्यक्ती आहे.
कोलकाता येथील एका 61 वर्षीय व्यक्तीबरोबर हे घडलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 61 वर्षीय व्यक्तीला चोंड्रोस्टेरियम परप्यूरियमची लागण झाल्याचे आढळून आले. हा एक बुरशीजन्य रोग आहे. पूर्वीच्या डॉक्टरांना हे समजू शकले नाही की असा रोग असू शकतो जो वनस्पतींपासून मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो.
व्यक्तीमध्ये दिसलेली लक्षणं
एका रिपोर्टनुसार, वृद्ध व्यक्ती व्यवसायाने वनस्पती मायकोलॉजिस्ट आहे. तीन महिन्यांपासून कर्कश आवाज, खोकला, थकवा आणि गिळताना त्रास यांसारखी लक्षणे दिसू लागली. त्रास वाढल्यावर तो डॉक्टरांकडे गेला. तपासले असता बुरशीजन्य संसर्ग असल्याचे आढळून आले. यामध्ये ताप, घसा खवखवणे, ओडिनोफॅगिया आणि मानेमध्ये हायॉइड हाडापर्यंत सूज येते.
व्यवसायाने वनस्पती मायकोलॉजिस्ट असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. विविध वनस्पतींच्या मशरूम आणि बुरशीसह तो बऱ्याच काळापासून काम करत होता. त्याचवेळी ती व्यक्ती या संसर्गाला बळी पडण्याची शक्यता आहे. दोन महिने दोन अँटीफंगल औषधे घेतल्यानंतर मायकोलॉजिस्ट बरा झाला आहे.
आजार काय आहे?
सिल्व्हर लीफ हा झाडांचा बुरशीजन्य रोग आहे, जो चोंड्रोस्टेरियम परप्यूरियम या बुरशीजन्य रोगकारक वनस्पतीमुळे होतो. हे हा रोग खूप धोकादायक आहे. यामध्ये पाने चांदीसारखी होतात. ही व्यक्ती या आजाराच्या विळख्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"