जी-२० टुरिझम वर्किंग ग्रुपची बैठक सोमवारपासून जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिका, अमेरिका रशिया, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी आणि युरोपियन युनियन यासारख्या १७ देशातील ६० प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये जी-२० बैठक होत असल्याने एकीकडे चीनने नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे अखेरच्या क्षणापर्यंत सौदी अरेबिया, इंडोनेशिया आणि तुर्कीने त्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही.मात्र धक्कादायक बाब म्हणजे भारतासोबत मैत्रीचा दावा करणाऱ्या इजिप्तनेही या बैठकीपासून लांब राहणेच पसंत केले आहे. इजिप्त हा जी-२० देशांचा सदस्य नाही आहे. मात्रा त्याला पाहुणा देश म्हणून निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र तरीही तो या बैठकीत सहभागी झाला नाही.
जी-२० ची बैठक काश्मीरमध्ये होत असल्याने इजिप्त या बैठकीत सहभागी झाला नाही. आता पाकिस्तान याकडे आपल्या मुत्सद्देगिरीचा विजय म्हणून पाहत आहे. काश्मीरमध्ये जी-२० बैठक होत असल्याने मुस्लिम देश यात सहभागी होणार नाहीत, असे सातत्याने सांगत आहे. पाकिस्तानने ब्रिटन आणि अमेरिकेशिवाय इतर अनेक देशांनाही या बैठतीत सहभागी न होण्याचं आवाहन केलं होतं. मात्र त्यांनी पाकिस्तानचं हे आवाहन फेटाळून लावलं.
भारत आणि इजिप्तमधील मैत्री दृढ असून, दोन्ही देशांची व्यापारामध्येही भागीदारी आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतरही इजिप्तने शांत राहणंच पसंद केलं होतं. मात्र जी-२० परिषदेत सौदी अरेबिया, तुर्की आणि इंडोनेशिया या देशांनंतर इजिप्तही सहभागी न झाल्याने पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.