लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत येत्या १ डिसेंबर रोजी जी-२० सामर्थ्यशाली गटाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहे. अध्यक्षपद मिळणे भारतासाठी खूप मोठी संधी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जगाचे हित साधण्यासाठी तसेच शांतता, ऐक्य, पर्यावरण, शाश्वत विकास यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर योग्य तोडगा काढण्यासाठी जी-२०च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.
मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले की, सामर्थ्यशाली जी-२० गटाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत सूत्रानुसार काम करणार आहे. गटाच्या देशांमध्ये जगातील लोकसंख्या आहे. जागतिक तीन चतुर्थांश जी-२० देशांत घडतात. जगातील एकूण जीडीपीमध्ये देशांचा हिस्सा टक्के आहे. अमृतमहोत्सवी काळात भारताला जी-२०चे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली.
विशेष कौतुकनागा संस्कृती टिकून राहावी म्हणून नागा लिडी-क्रो-यू संस्था स्थापन केली आहे. उत्तर प्रदेशमधील गावामध्ये जतीन ललित सिंह यांनी दोन कम्युनिटी लायब्ररी व रिसोर्स सेंटर सुरू केले आहे. झारखंडमधील काही जिल्ह्यात काम करण्यासाठी संजय कश्यप यांनी ग्रंथालयाची स्थापना केली. सर्व व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात खास उल्लेख केला.