G-20 Summit: इंडोनेशियातील बाली येथे G-20 शिखर परिषदेत जगातील अनेक मोठे नेते एकत्र आले आहेत. या परिषदेत PM नरेंद्र मोदीभारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यादरम्यान, त्यांनी जगभरातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. परंतू त्यांचा बुधवार(16 नोव्हेंबर) रोजी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या छायाचित्रात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यापासून काही अंतरावर बसलेले दिसत आहेत.
हा फोटो बालीतील खारफुटीच्या जंगलातील आहे. या जंगलात सर्व नेते मिळून वृक्षारोपण करत होते. यानंतर जो बायडन आणि पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एका जागी बसलेला फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत जो बायडन (Joe Biden) पीएम मोदींना सॅल्यूट(सलाम) करताना दिसत आहेत, तर नरेंद्र मोदीही बायडन यांना सलाम करत प्रत्युत्तर देत आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यासाठी जागतिक नेते रोपे लावत असल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत
यातील एका फोटोमध्ये पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि त्यांचे इंडोनेशियन समकक्ष जोको विडोडो कॅमेऱ्याकडे हसताना दिसत आहेत. दुसर्या फोटोमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी बोलत आहेत. काल समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये बायडन मोदींना मिठी मारताना दिसले.