शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

G20 Summit: आता G-20 चे अध्यक्षपद भारताकडे; PM मोदी म्हणाले- 'ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 6:22 PM

G20 Summit: इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी G20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले.

G20 Summit:इंडोनेशियाची राजधानी बाली येथे G20 शिखर परिषदेचे (G20 Summit) आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांच्या शिखर परिषदेनंतर आज याची सांगता झाली. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी G20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले. म्हणजेच आता पुढील G20 शिखर परिषद भारतात होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शिखर परिषदेला संबोधित केले.

काय म्हणाले पीएम मोदी?शिखर परिषदेच्या समारोप समारंभात इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी G20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले. 1 डिसेंबरपासून भारत अधिकृतपणे G20 चे अध्यक्षपद स्वीकारेल. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जगाला भौगोलिक-राजकीय तणाव, आर्थिक मंदी यांचा सामना करावा लागत असताना भारत G-20 ची जबाबदारी घेत आहे. अशा परिस्थितीत जगाला G20 कडून मोठ्या अपेक्षा आहेत. G20 चे अध्यक्षपद मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.'

नरेंद्र मोदी भारताकडे रवानाइंडोनेशियातील बाली येथे झालेल्या G20 परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतत आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इतर अनेक जागतिक नेत्यांशी अनौपचारिक चर्चा केली आणि अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. यादरम्यान इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी पुढील G20 परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. 

G20 मध्ये मोदींचा संदेश घुमलापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिलेल्या संदेशाची प्रतिध्वनी बुधवारी G20 शिखर परिषदेच्या घोषणेने व्यक्त केली. जाहीरनाम्यात, नेत्यांनी "आजचे युग युद्धाचे युग नसावे" असे म्हणत युक्रेन युद्ध त्वरित संपविण्याचे आवाहन केले. शिखर परिषदेच्या शेवटी एक डॉक्यूमेंट जारी करण्यात आले, ज्यामध्ये युक्रेनवरील रशियन आक्रमण आणि त्याचे जगावर होणारे परिणाम यावर व्यापक चर्चा करण्यात आली.

G-20 मध्ये कोणते देश?G-20 मध्ये भारत, इंडोनेशिया, इटली, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका, आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. G20 ही जागतिक आर्थिक सहकार्याची प्रभावशाली संघटना आहे. हे जागतिक जीडीपीच्या सुमारे 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाIndonesiaइंडोनेशियाNarendra Modiनरेंद्र मोदी