G20 Summit Update: गेल्या काही काळापासून अनेक क्षेत्रांमध्ये Ai तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आता भारतात आयोजित करण्यात आलेल्या G-20 परिषदेच्या कार्यक्रमातही एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येणाऱ्या सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांसाठी एक AI अँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. ही अँकर येणार्या पाहुण्यांचे स्वागत करेल.
नृत्य करणारी तरुणी आकर्षणाचे केंद्र असेलमोहेंजोदारो काळातील नृत्य करणाऱ्या महिलेची पाच फूट उंच प्रतिमा लावण्यात आली आहे. ही सिंधू संस्कृतीबद्दलची माहिती देईल. रामजी सुतार यांनी ही डान्सिंग गर्ल तयार केली आहे. रिसेप्शन एरियातील रोटेशन पॅनेलवर बसवली जाईल.
भारतातील लोकशाहीचा प्रवासवैदिक काळापासून भारतात लोकशाही आहे, ज्यामध्ये कायद्याचे राज्य आणि सुशासन दिसून आले आहे. हिमाचलच्या मलाना गावाचे चित्र दाखवण्यात येणार आहे, ज्यामध्ये गेल्या हजारो वर्षांपासून लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत. हे सर्व डिजिटल वॉलवर दाखवले जाईल.
AI अँकर स्वागत करेलसंपूर्ण प्रदर्शन कसे असेल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सांगितले जाईल. एक AI अँकर तयार करण्यात आली आहे, जी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देईल. ही अँकर सोळा भाषांमध्ये बोलू शकणार आहे. यामध्ये हिंदी, इंग्रजी, जपान, कोरियन, चीन, रशिया, तुर्की, अरबी डच, पोर्तुगीज, बंगाली, इंडोनेशिया या भाषांचा समावेश आहे.