नवी दिल्ली : भारतातील G20 नेत्यांच्या बैठका दिल्लीतील प्रगती मैदानावर पुनर्विकसित आयटीपीओ (ITPO) कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २६ जुलै रोजी या कॉम्प्लेक्सचे उद्घाटन होणार आहे. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) च्या मालकीच्या जागेच्या पुनर्विकासाची जबाबदारी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या बांधकाम कंपनीला देण्यात आली होती.
प्रगती मैदान सुमारे १२३ एकर परिसरात पसरलेले, हे कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात मोठे एमआयसीई (मीटिंग, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शन) कार्यक्रम आयोजित करेल. पुनर्विकसित आणि आधुनिक IECC कॉम्प्लेक्सचा जगातील १० सर्वात मोठ्या प्रदर्शन आणि अधिवेशन कॉम्प्लेक्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हे जर्मनीतील हॅनोव्हर प्रदर्शन केंद्र आणि शांघायमधील राष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रला टक्कर देऊ शकते.
७ हजार लोकांसाठी आसनव्यवस्था, आलिशान अॅम्फी थिएटर!IECC पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या भारताच्या क्षमतेची साक्ष आहे. कन्व्हेन्शन सेंटरच्या लेव्हल ३ वर ७ हजार लोकांची आसनक्षमता आहे, तर ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित सिडनी ऑपेरा हाऊसची बसण्याची क्षमता अंदाजे साडेपाच हजार आहे. याशिवाय, IECC कडे तीन हजार व्यक्तींच्या आसनक्षमतेसह एक भव्य अॅम्फीथिएटर देखील आहे, जे ३ PVR थिएटरच्या समतुल्य आहे. याठिकाणी प्रदर्शन, सांस्कृतिकआणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
व्यवसाय आणि नेटवर्किंगसाठी उत्तम व्यासपीठ!IECC येथे जागतिक स्तरावर मेगा परिषद, आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जातील. यामध्ये उत्पादने, नवकल्पना आणि विचारांचे प्रदर्शित करण्यासाठी सात नवीन प्रदर्शनी हॉल देखील आहेत. हे अत्याधुनिक हॉल प्रदर्शक आणि कंपन्यांना आपल्या प्रेक्षकांशी संलग्न राहण्यासाठी, व्यवसाय विकास आणि नेटवर्किंग संधींना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करतील.
५ हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थायाचबरोबर, IECC मध्ये येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी साडेपाच हजारहून अधिक वाहनांसाठी पार्किंग देखील आहे. सिग्नलमुक्त रस्त्यांमुळे अभ्यागतांना कोणत्याही त्रासाशिवाय कार्यक्रमस्थळी पोहोचण्याची सुविधा करण्यात आली आहे.