नवी दिल्ली - प्रसिद्ध शेफ अजय चोप्रा, कुणाल कपूर आणि अहनिता यांनी दिल्लीच्या प्रगती मैदानातील ‘भारत मंडपम्’ येथे आयोजित जी-२० शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांसाठी स्वतःच्या हाताने जेवण तयार केले. त्याचे फोटोही त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. भारतात येणाऱ्या पाहुण्यांची विशेष काळजी घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्याची, फेरफटका मारण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
देशातील तीन सेलिब्रिटी शेफनी पाहुण्यांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ सप्टेंबर रोजी दुपारच्या जेवणाचे आयोजन केले होते, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाहुण्यांसाठी रात्रभोजचे आयोजन केले होते. त्यात बाजरीपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या पदार्थांचा समावेश होता. याशिवाय देशातील अनेक प्रसिद्ध पदार्थही देण्यात आले.
सर्वांची मने जिंकलीयाशिवाय तरुण शेफ कुणाल कपूरनेही आपल्या पदार्थांच्या चवीची जादू पसरवली. त्यानेही हा एक अविश्वसनीय अनुभव होता, अशी भावना व्यक्त केली. लेडी शेफ अहनिता यांनीही स्वत: बनवलेल्या पदार्थाने सर्वांची मने जिंकली.
‘त्या-त्या देशांच्या प्रथम महिला नागरिकांना सेवा देणे हा सन्मान आहे. मी नेहमीच बाजरीबरोबर स्वयंपाक करण्याचा आणि माझ्या स्वयंपाकाद्वारे जगभरातील लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.’ - अजय चोप्रा, शेफ