शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

आम्ही हिंसाचार आणि द्वेषाच्या विरोधात; कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंचे खलिस्तानबाबत भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 6:31 PM

बैठकीत PM नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील खलिस्तानी समर्थकांचा मुद्दा उपस्थित केला.

G20 India: राजधानी दिल्लीत आयोजित G20 शिखर परिषदेचा (G20 Summit) आज समारोप झाला. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांनी खलिस्तानसह परकीय हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर चर्चा केली. बैठक संपल्यानंतर ट्रुडो यांनी खलिस्तान मुद्द्यावर आपले मत मांडले.

कॅनडात अभिव्यक्ती स्वातंत्र्यट्रुडो पुढे म्हणतात, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान भारत आणि कॅनडामधील नियमांचे पालन करण्याबाबतही चर्चा झाली. कॅनडा नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतो, परंतु आम्ही हिंसाचार आणि द्वेष पसरविण्याच्या विरोधात आहोत. खलिस्तानी अतिरेक्यांच्या मुद्द्यावर ट्रूडो म्हणाले की, काही लोक संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

आम्ही हिंसेच्या विरोधातट्रूडो पुढे म्हणाले, द्विपक्षीय बैठकीत खलिस्तानी अतिरेकी आणि परदेशी हस्तक्षेप, या मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या काही वर्षांत हा मुद्दा अनेकदा चर्चिला गेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण निषेधाचे स्वातंत्र्य कॅनडासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही नेहमीच हिंसाचार थांबवण्यासाठी आणि द्वेष कमी करण्यासाठी उभे आहोत. काही व्यक्तींच्या कृती संपूर्ण समुदायाचे किंवा कॅनडाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

भारत कॅनडाचा महत्त्वाचा भागीदार भारत-कॅनडा संबंध आणि पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या संबंधांबद्दल, कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, आम्ही जाणतो की, भारत ही जगातील एक महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे. हवामान बदलाशी लढा देण्यापासून ते विकास आणि समृद्धी निर्माण करण्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीत भारत कॅनडासोबत आहे. आम्हाला आणखी काम करायचे आहे आणि आम्ही ते करत राहू.

कॅनडात भारतविरोधी पोस्टर्स खलिस्तानी समर्थकांना आश्रय दिल्याने कॅनडा अनेकदा चर्चेत असतो. भारतात जेव्हा-जेव्हा खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई होते, तेव्हा त्याचे पडसाद कॅनडात उमटतात. अलीकडेच, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर समर्थकांनी 8 जुलै रोजी कॅनडात भारतविरोधी रॅली काढण्याची घोषणा केली होती. कॅनडात अनेक ठिकाणी रॅलीसंदर्भातील पोस्टर्स पाहायला मिळाले होते.

पोस्टरवर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडातील या रॅलीवर तीव्र आक्षेप नोंदवला होता. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले की, कॅनडामध्ये लावण्यात आलेले पोस्टर्स आमच्या राजनैतिक अधिकारी आणि दूतावासांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणारे आहेत. हे भारताला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. 

 

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदIndiaभारतCanadaकॅनडाNarendra Modiनरेंद्र मोदी