काॅंग्रेस नेतृत्वाविराेधात ‘जी २३’ पुन्हा सक्रिय; सोनियांची त्या आधीच मोठी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:28 AM2022-03-11T07:28:07+5:302022-03-11T07:28:27+5:30

ग्रुप-२३चा कोणताही नेता हल्लाबोल करण्यापूर्वीच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची बैठक बोलाविण्याची घोषणा केली आहे. त्या बैठकीत राहुल यांच्याबाबतची नाराजी निघून जावी, असा त्या मागील उद्देश आहे.

G23 re-activates against Congress leadership | काॅंग्रेस नेतृत्वाविराेधात ‘जी २३’ पुन्हा सक्रिय; सोनियांची त्या आधीच मोठी खेळी

काॅंग्रेस नेतृत्वाविराेधात ‘जी २३’ पुन्हा सक्रिय; सोनियांची त्या आधीच मोठी खेळी

Next

- शीलेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर होणारी टीका पाहता त्यांचे समर्थक समर्थनासाठी पुढे आले आहेत. ग्रुप-२३चा कोणताही नेता हल्लाबोल करण्यापूर्वीच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची बैठक बोलाविण्याची घोषणा केली आहे. त्या बैठकीत राहुल यांच्याबाबतची नाराजी निघून जावी, असा त्या मागील उद्देश आहे.

असे असले तरी काँग्रेसचे अनेक मोठे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. याच साखळीत सर्वांत पहिला हल्ला पक्षाचे खा. अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेस एकापाठोपाठ एक निवडणुका हारत चालली आहे. परंतु २०१४ नंतर झालेल्या पराभवांपासून आम्ही कोणताही धडा शिकलेलो नाहीत. पक्षाला आत्मचिंतन करण्याबरोबरच संपूर्ण पक्षात नवीन बदल करण्याची गरज आहे. सिंघवी यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडेच होता.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेले ए. के. अँटोनी यांनी तर दुखी होऊन कोणताही हल्लाबोल केल्याशिवाय सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजकारणातून संन्यास घेतला. 
 

Web Title: G23 re-activates against Congress leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.